चंदगड तालुक्यातील कालकुंद्री येथे व्यसन मुक्त गाव मोहिमेला सुरुवात - चंदगड लाईव्ह न्युज

17 June 2021

चंदगड तालुक्यातील कालकुंद्री येथे व्यसन मुक्त गाव मोहिमेला सुरुवात

कालकुंद्री (ता. चंदगड) येथे शपथ घेऊन व्यसनमुक्त गाव मोहिमेची सुरुवात करण्यात आली.


माणगाव (राजेंद्र शिवणगेकर )

         चंदगड तालुक्यातील कालकुंद्री येथील शिवस्मारक  समितीतर्फे व्यसन मुक्त गाव मोहिमेचा प्रारंभ झाला .गावातील दोन युवकांनी त्याला उत्स्फूर्तपणे साथ देऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दारू सोडण्याची शपथ घेतली. वर्षभरात गावातील अवैध दारूचे धंदे बंद करून व्यसनाधीन युवकांचे प्रबोधन करून गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्प समितीने घेतला आहे .

      चंदगड तालुक्यातील कालकुंद्री येते शिवस्मारक समितीचे संस्थापक सदस्य शरद जोशी यांनी कालकुंद्री विकास मंच या गावातील व्हाट्सअप ग्रुपवर गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्पना मांडली .त्याला सर्वांनी पाठिंबा देत या मोहिमेत सहभागी होण्याचे आश्वासन दिले .शिव स्मारक समितीतर्फे व्यसनमुक्त गाव मोहिमेचा प्रारंभ झाला असून गावातील दोन युवकांनी त्याला उत्स्फूर्तपणे साथ देऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दारू सोडण्याची शपथ घेतली. वर्षभरात गावातील अवैध दारूचे धंदे बंद करून व्यसनाधीन युवकांचे प्रबोधन करून गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्प समितीने घेतला असून या पार्श्वभूमीवर त्याला उमाजी कांबळे, आप्पाजी  पाटील यांनी आपण दारू सोडणार असल्याचे आश्वासन दिले. या दोघांचा उपसरपंच संभाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य अझरुद्दीन शेख यांच्या हस्ते सत्कार करून या मोहिमेचा शिवाजी चौकात प्रारंभ करण्यात आला .यावेळी गजाभाऊ पाटील, शिवाजी पाटील ,नारायण जोशी, विनोद पाटील ,उत्तम कोळी ,भरत पाटील ,अरविंद सोनार, निवृत्ती तेऊरवाडकर यांच्यासह बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment