एस टी. च्या खाजगीकरण विरोधात मूलनिवासी कर्मचारी संघाचा एल्गार - चंदगड लाईव्ह न्युज

08 June 2021

एस टी. च्या खाजगीकरण विरोधात मूलनिवासी कर्मचारी संघाचा एल्गार

चंदगड येथे नायब तहसीलदार संजय राजगोळे यांना एसटीच्या खाजगीकरण विरोधात निवेदन देताना मूलनिवासी संघटनेचे पदाधिकारी.
चंदगड : सी एल वृत्तसेवा 

      महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सुरू असलेले खाजगीकरण तात्काळ रद्द करा. या मागणीसाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघामार्फत संघाच्या १७ उपशाखा मार्फत सात जून रोजी काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आले. खाजगीकरण प्रक्रिया न थांबल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, व्यवस्थापकीय संचालक म.रा.मा.प. मुंबई यांच्यासह जिल्हाधिकारी, तहसीलदार, विभागीय नियंत्रक व आगार व्यवस्थापक यांना यावेळी दिले.

      महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच एसटी महामंडळाच्या अखत्यारीतील स्वच्छतागृहे, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पार्सल व्यवस्था आणि शिवशाही बस यांचे खाजगीकरण केले आहे. उर्वरित एसटीचे ही पूर्णपणे खाजगीकरण करण्याचा घाट घातला आहे. यामुळे नवीन भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळण्याऐवजी आहेत त्या नोकऱ्यांवरही गंडांतर निश्चित आहे. याला विरोध करण्यासाठी मूलनिवासी संघटनेने एल्गार पुकारला असून संघटनेचे चंदगड शाखा पदाधिकारी प्रकाश नाग, गजानन तरवाळ, अमित कांबळे, लमू येडगे आदी कार्यकर्त्यांनी तहसीलदार तसेच आगार व्यवस्थापक यांना खाजगीकरण विरोधातील निवेदन दिले. गरिबांच्या एसटीच्या खाजगीकरण विरोधात जनआंदोलन उभे राहिले पाहिजे. अन्यथा गरिबांची एसटी धनदांडग्या कंपन्यांच्या घशात जायला वेळ लागणार नाही. असे यावेळी नाग यांनी सांगितले.


1 comment:

Unknown said...

Very nice chandgad unit

Post a Comment