संत गजानन हाँस्पिटल ' नॉन कोविड' रुग्नासाठी ठरले जिवनदायीनी, या विभागातील म्युकरमायकोसिच्या रुग्नासाठी उपचाराची सोय - चंदगड लाईव्ह न्युज

14 June 2021

संत गजानन हाँस्पिटल ' नॉन कोविड' रुग्नासाठी ठरले जिवनदायीनी, या विभागातील म्युकरमायकोसिच्या रुग्नासाठी उपचाराची सोय

महागाव येथील संत गजानन महाराज रुरल हाँस्पिटल


महागाव / सी. एल. वृत्तसेवा
         महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज रुरल रुग्णांलयातील गोरगरीब रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून  कोरोना काळात तब्बल सहाशे हुन अधिक रुग्णांना मोफत उपचार करण्यात आला आहे. यामध्ये कोरोना बधित 80 हून अधिक तर इतर वेगवेगळ्या विभागातील 450 हून अधिक रुग्णांनी योजनेतून मोफत उपचार लाभ घेतला असल्याची माहिती डॉ. यशवंत चव्हाण यांनी दिली.

          डॉ.चव्हाण म्हणाले, "हॉस्पिटल मधील नियमित रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी कोवीड निदान व उपचार केंद्र हे स्वतंत्र उभारण्यात आली आहे याचा फायदा या उपविभागातील रुग्णाला मिळत आहे यामध्ये कोरोनाच्या काळात स्त्रीरोग विभागातील 175 हून अधिक सिझेरियन प्रसूती, मूत्ररोग मधील 132 , नवजात शिशु विभागातील 82 तसेच आयसीयू मधील इतर आजारांवरील पन्नास शस्त्रक्रिया व उपचार यशस्वी व मोफत केल्या आहेत यामुळे कोरोना उपचार बरोबरच सर्वाधिक नॉन कोविड रुग्णांवरील शस्त्रक्रिया व उपचार करणारे या विभागातील एकमेव हॉस्पिटल असल्याचेही सांगितले "

           कोविड सेंटरमधील आत्तापर्यंत 162 बधितानी उपचार घेतले असून डॉक्टरांचे उत्कृष्ट सेवेमुळे येथे मृत्युदर ही कमी आहे अधिकाधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तसेच आतापर्यंत  योजनेतून 82 रुग्णांवर मोफत उपचार केला आहे  सर्वाधिक  नव्वद वर्षावरील वयोवृध्द,पाच मुले, चार गरोदरमाता असे बाधित रुग्ण बरे होऊन परतले आहेत. नॉन कोविड नियमित रुग्नासाठी स्वतंत्र विभाग असल्याने अधिकाधिक रुग्णांनी न घाबरता इतर आजारांवरील मोफत शस्त्रक्रिया व उपचाराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. चव्हाण यांनी केला आहे. 

            येथील हॉस्पिटल व कोविड सेंटरसाठी डॉ. प्रतिभा चव्हाण ,डॉ.सुरेखा चव्हाण ,डॉ. गौरव बाबर ,डॉ. आशुतोष गावकर, डॉ. सुप्रिया मुधोळकर, डॉ. रूपाली कोरी डॉ.मंगल मोरबाळे, डॉ.माधव पठाडे, यासह इतर तज्ञ डॉक्टर्स व कर्मचारी अविरत सेवा देत आहेत.दरम्यान डॉ.सुभाष नांगरे,  राहूल तंवर ,डॉ. किरण कुंडलकर, डॉ.चेतन खाडे या जिल्हा वैद्यकीय अधिकारी टीमने हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णांवरील उपचार व माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.

                           *म्युकरमायकोसिस वरील उपचार* 
           म्युकरमायकोसिस वरील  आजारावर मोफत उपचार घेण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने या विभागासाठी संत गजानन हॉस्पिटल मध्येच सोय केली आहे. यासाठी सुसज्ज पाच स्वतंत्र बेडची सोय करण्यात आली आहे. इ.एन.टी.डॉक्टराच्या कमतरतेमुळे या शस्त्रक्रिया साठी सध्या केवळ केएलई बेळगाव, डी वाय पाटील व सीपीआर कोल्हापूर येथील रुग्णालयातच सोय असून ती पूर्णतः मोफत असल्याची माहिती डॉ. किरण कुंडलकर यांनी दिली.


No comments:

Post a Comment