आमदार राजेश पाटील कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता - जि. प. सदस्य अरुण सुतार - चंदगड लाईव्ह न्युज

14 June 2021

आमदार राजेश पाटील कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता - जि. प. सदस्य अरुण सुतार

         चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्याविषयीचा लेख ...........................

आमदार राजेश पाटील

           राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते. तालुक्याचे च नव्हे तर जिल्ह्यात ज्येष्ठ नेते कै. आमदार नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडविले. त्यांचा वारसा आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी जपला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव, आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीत त्यांनी जनमाणसांत वेगळे स्थान निर्माण केले. महापूर, कोरोना यांसारख्या संकटात ते जनतेच्या मदतीला धावून आले. मतदार संघाच्या विकासाच्या नवनव्या संकल्पना ते मांडत अधिकच तेजस्वी बनतात, सर्वसामान्य पक्ष कार्यकर्त्याला बळ देऊन त्याला उभे करण्याचे काम ते करतात.

           नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सचिव ते विद्यमान आमदार अशी गरुडझेप घेणाऱ्या नेतृत्वाचा आज वाढदिवस...! वाढदिवस....प्रभाव दमदार आणि स्वभाव दिलदार असणाऱ्या थोर व्यक्तिमत्त्वाचा.

        केवळ तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्याच्या पर्यायाने राज्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने वेगळे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ नेते कै नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांच्या उक्ती आणि कृतीचा वारसा आमदार राजेश पाटील  यांनी जपला आहे. तसे उच्च शालेय शिक्षणाबरोबर कायद्याची पदवी घेऊन २२ ते २३ व्या  वर्षांपासून ते राजकारण, समाजकारण आले आणि नव महाराष्ट्र सारख्या शैक्षणिक संस्थेचा कार्यभार पाहताना त्यांनी या संस्थेला महाराष्ट्राच्या नकाशावर नेले. गतिमान शिक्षणातून समाजपरिवर्तन हे ब्रीद घेऊन ते काम करीत असून. शैक्षणिक संस्थेचा डोलारा सांभाळतानाच त्यांनी महिला सबलीकरण तसेच बेरोजगारी आशा सामाजिक प्रश्नावर लक्ष केंद्रित केले.   

         चंदगड तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून आपले नेतृत्व सिद्ध करताना महाराष्ट्र शासनाचे सहकार भूषण तसेच महापणन पुरस्कार मिळवून दिले, तुळशी बाजार या नावाने फक्त तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये संघाचा डोलारा उभा केला, गेली सहा वर्ष जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नाव लौकिक असलेल्या गोकुळ संघाच्या संचालकपदी असताना त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवली आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील दिग्गजांसोबत खांद्याला खांदा लावून आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.

        साहेबांनी चंदगडच्या राजकीय आखाड्यात अनेक कार्यकर्त्याना घडवलं, वाढवलं मोठं केलं. राजकारणाच्या सारीपटावर त्यांच्या पासून अनेकजण दूरही गेले पण सर्व सामान्य माणसाची निष्ठा कायम  कै. मा. आमदार, सहकार महर्षी नरसिंगराव गुरुनाथ पाटील साहेब  घराण्या सोबत राहिली आहे. थेट लोकांमध्ये जाऊन, त्यांना भेटून त्यांच्या जीवनाच्या समस्यांचे त्यांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब सत्ताकारणात, समाजकारणात प्रकट व्हावे ही लोकनेते आदरणीय नरसिंगराव पाटील साहेबांची भूमिका...

         'खोला धावे पाणी' या निसर्ग नियमानुसार नरसिंगराव पाटील साहेब यांच्या कार्याचा कृतिशील वारसा आमदार राजेश पाटील तसेच जिल्हा परिषद कोल्हापूर चे माझी शिक्षण व अर्थ चे सभापती महेश नरसिंगराव पाटील हे समर्थपणे तसेच सक्षमपणे पुढे घेऊन जात आहेत. 

         पूर्वजांचं कर्तृत्व, पुण्याई वडिलांचा आशिर्वाद व नातेवाईकांचे पाठबळ जरी पाठीशी असले तरीही आपल्या कार्याने स्वकर्तृत्वाची भर टाकण्यात राजेश दादा कमालीचे यशस्वी झालेले दिसतात.

         नरसिंगराव पाटील साहेबांच्या यांच्या अचानक निधनानंतर राजेश पाटील साहेबांनी चंदगड विधानसभा मतदारसंघासह राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी खांद्यावर घेतली. राज्याच्या इतिहासातील पहिल्याच फटक्यात व सर्वात कमी खर्चात झालेला  आमदार म्हणून राजेश पाटील साहेबांचं नाव नेतेमंडळी कौतुकाने घेतात तेव्हा तेव्हा माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या माना अभिमानानं ताठ झाल्याशिवाय राहात नाहीत.

              तालुक्यातील अतिवृष्टीच्या, ओल्या दुष्काळी च्या  जनतेच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना शासनस्तरावरून मदत व्हावी यासाठी तसेच वन्य प्राणी प्राण्या पासून होणारे शेतीचे नुकसान भागातील पिण्याचे पाणी व सीमाप्रश्न या प्रमुख  वरती त्यांच्या माध्यमातून अधिवेश गाजवताना नेहमीच निदर्शनास येत आहे.  गतवर्षी अतिवृष्टी ने जो थैमान घातला व पूरस्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये साहेबांनी आपली कार्यतत्परता दाखवून स्वखर्चाने धान्य व साहित्य लोकांना पुरवून "एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ" या उक्तीप्रमाणे फक्त कार्यच केलं नाहीतर  पूर ओसरल्यानंतर स्वच्छता, रोगराई पसरू नये याची खबरदारी घेत पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करून संवेदनशील नेता कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ चंदगड तालुक्याला घालून दिला.

         त्यानंतर राज्यासह जिल्ह्यावर तालुक्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटातही ते लोकांच्या मदतीला धावले. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी त्यांचे प्रयत्न होते. त्याला बऱ्याचअंशी यशही आले. जिल्हा परिषद असेल तसेच नगरपंचायत  क्षेत्रातील प्रत्येक प्रश्नांवर त्यांचे बारीक लक्ष असते. भागातील लोकांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी ते नेहमीच मार्गदर्शन करीत असतात. नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांना बळ देण्याचेही ते काम करतात. पाणी, दुष्काळ, आरोग्याच्या प्रश्नासोबतच जिल्ह्याच्या विकासावर त्यांनी भर दिला आहे.

           माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांच्यात ऊर्जा निर्माण करण्याचे काम आमदार राजेश पाटील यांनी अविरत केले. त्यामुळे तालुक्यातील तरुणांचे ते आशास्थान बनले आहेत. त्यातूनच आश्वासक आणि प्रेरक नेतृत्वाची साक्ष जनतेला पटली आणि त्यामुळे राजेश दादा यांच्याकडून जनतेला फार मोठ्या अपेक्षा आहेत. जनतेच्या कसोटीवरही ते यशस्वी ठरो आणि राज्याचे नेतृत्व करो, हीच "आमचा कृतीशील विचारांचा गतिशील युवा नेता, चंदगड विधानसभा मतदारसंघाचे कार्यकुशल, कार्यसम्राट, दमदार आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा.

                              लेखन  - जिल्हा परिषद सदस्य अरुण सुतार No comments:

Post a Comment