वटपौर्णिमा - सात जन्माच्या साथीसाठी महिलांचे वटवृक्षाला साकडे - चंदगड लाईव्ह न्युज

24 June 2021

वटपौर्णिमा - सात जन्माच्या साथीसाठी महिलांचे वटवृक्षाला साकडे

अडकूर येथे वटवृक्षाची पुजा करताना सुवासिनी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        सात जन्मी हाच पती मिळू दे, असे वटवृक्षाला साकडे घालत चंदगड तालुक्यातील महिलांनी मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली. 

         वटवृक्षाला   सर्वाधिक आयुष्य लाभले आहे. दिर्घकाळ आयुष्य असणारा व औषधी गुणधर्माणे परिपूर्ण असणाऱ्या या वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे . त्यामुळे सर्वच सुवासिनी आपल्या पतिराजाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्माच्या प्राप्तीसाठी हिंदू धर्म शास्त्राप्रमाणे वटपौर्णिमेदिवशी वडाची मनोभावे पुजा करतात. आज  चंदगड तालुक्यातील सुवासिनी वटपौर्णिमा दिवसाचे औचित्य साधून वडाची पुजा करण्यासाठी  मोठ्या संख्येने वटवृक्षा जवळ  उपस्थित होत्या. 

        यावेळी नटलेल्या व नऊवारी नेसुन सजलेल्या सुहासिनीनी मला व माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे म्हणून  सुती धागा हातात धरून वडाला सात फेऱ्या मारल्या व वडाची मनोभावे पूजा केली. तसेच पती देवाला अखंड आयुष्य लाभू दे अशी प्रार्थनही केली.  यावेळी वान म्हणून पाच प्रकारच्या फळांची एकमेकींना भेट दिली. यावेळी नववधू, सुवासिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment