चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने " "माझं गाव कोरोना मुक्त गाव अभियान", कोरोना बचावाबाबत जनजागृती - चंदगड लाईव्ह न्युज

03 June 2021

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने " "माझं गाव कोरोना मुक्त गाव अभियान", कोरोना बचावाबाबत जनजागृती

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी अभिजित जगताप, शेजारी न. एस. एस. प्रकल्प अधिकारी प्रा. संजय पाटील.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      शिवाजी विद्यापीठ  कोल्हापुर अंतर्गत चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने "माझं गाव कोरोना मुक्त गाव अभियान" राबविण्यात येत आहे. या अंतर्गत माडखोलकर महाविद्यालयाने चंदगड, कानूर, सडेगुडवळे, कुरणी, कोकरे-अडूरे, किरमटेवाडी ही गावे दत्तक घेतलेली आहेत. 

      स्थानिक पाच-पाच विद्यार्थ्यांची कोविड योद्धा समिती तयार करून ग्रामपंचायतीच्या व स्थानिक कोरोना नियंत्रण समिती, आशा वर्कर्स डॉक्टर्स, पोलीस इ. च्या सहकार्याने कोरोना लसीकरण, मास्क, सॅनिटायझरचा वापर व वाटप, सुरक्षित अंतर पाळा, कोरोना टाळा, लहान मुलांचे संगोपन व आरोग्यविषयक प्राथमिक काळजी,  होम काॅरंटाईनची दक्षता,  प्रथमोपचार, मनोरंजनातून आनंददायी जीवन, पथनाट्यातून, व्याख्यानातून प्रबोधन, वाट्सप, फेसबुक, डिजिटल फलकारद्वारे ग्रामस्थांचे प्रबोधन करून या कोरोनातून समाजाला मुक्त करण्याचे कार्य सुरू केलेले आहे. 

   आज चंदगड नगरपंचायतीच्यावतीने स्वयंसेवकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व स्वयंसेवकांचे लसीकरण करवून घेण्याची सूचना करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने वयस्कर, आजारी व्यक्ती, 45 वर्षावरील लसीकरण राहिलेले लोक यांच्या शंभर टक्के लसीकरण पूर्ण करून घेण्याची जबाबदारी स्वयंसेवकांनी घेतली. चंदगड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित जगताप यांनी बाजारपेठेत होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविणे, दुकानदार, व्यापारी यांचे प्रबोधन, मास्कचा वापर अनिवार्य, स्वच्छता, आरोग्यासंबंधीची काळजी  घेण्यासाठी लोकांना प्रबोधन करण्यासाठी स्वयंसेवकांना मार्गदर्शक सूचना केल्या. विद्यापीठ व महाविद्यालयांनी सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे  कौतुक व अभिनंदन केले. आपल्या चंदगड गावची दत्तक गाव म्हणून निवड केल्याबद्दल प्राचार्य, प्रकल्प अधिकारी, महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे आभार व्यक्त केले. या बैठकीत नगरपंचायतीचा सर्व स्टाफ, एन. एस. एस. स्वयंसेवक उपस्थित होते. एन. एस. एस. प्रकल्प अधिकारी प्रा. संजय पाटील यांनी आभार मानले.




1 comment:

Prof. SANJAY NARAYAN PATIL- R.B.MADKHOLKAR COLLEGE, CHANDGAD, Dist-KOLHAPUR said...

बातमी सुन्दर तयार केली आहे, धन्यवाद.
चंदगड लाईव पॅनेलला मिळणारा उत्तम प्रतिसाद अभिनंदनीय आहे, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

Post a Comment