कुदनूर येथील पाच वर्षाच्या चिमुकलीचा आगळा वेगळा उपक्रम, वाढदिवसादिवशी केले हे निसर्गोपयोगी काम - चंदगड लाईव्ह न्युज

20 June 2021

कुदनूर येथील पाच वर्षाच्या चिमुकलीचा आगळा वेगळा उपक्रम, वाढदिवसादिवशी केले हे निसर्गोपयोगी काम

वाढदिवसाचा खर्च टाळून वृक्षारोपन करताना चि. मनाली व चि. औदुंबर

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         कुदनुर (ता. चंदगड) येथील कु. मनाली मारूती तवनोजी या चिमुकल्या मुलीने आज कुदनूरमध्ये आगळा वेगळा उपक्रम केला. आपल्या वाढदिवसावर केला जाणारा पूर्ण खर्च टाळून आरोग्याला हितकारक असणाऱ्या वड, पिंपळ या वृक्षांचे वृक्षारोपन केले. चिमुकलीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

          वाढदिवस म्हणजे लहान मुलांचा सर्वांत आनंदाचा क्षण. कारण या वाढदिवसाला केक, चॉकलेट, गिप्ट तर मिळतातच पण मित्र सुद्धा एकत्र येऊन शुभेच्छा देतात. आणि हेच या चिमुकल्यांच्या आवडीचे असते. पण याला अपवाद ठरली ती कुदनूरची मनाली. आपला ५ वा वाढदिवस वृक्षरोपनाने साजरा केला. आज हातात चॉकलेट नव्हती तर चक्क पिंपळ आणि वटवृक्षाची रोपे. केवळ वृक्षारोपनच केले नाही तर वडीलांच्या बरोबर या कृक्षांचे पूर्ण संगोपन करण्याची जबाबदारी सुद्धा स्विकारली. त्याबरोबरच श्री सिद्धेश्वर हायस्कूल कुदनुरला पण वृक्ष भेट देण्यात आली. यावेळी मनालीचे वडील मारूती तवनोजी, कुं. औंदुंबर, मारूती तवनोजी, शंकर तवनोजी, चंद्रकांत कोकितकर, ग्रा. प. सदस्य प्रकाश कसलकर, श्रीगणेश बीरजे, मुख्याध्यापक आर. डी. कुंभार, मुबारक मंगसुळी, निलेश कुंभार, विलास सरमळकर आदि मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment