![]() |
कोनेवाडी बंधारा रविवारीही पाण्याखालीच राहिला. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
गेले चार-पाच दिवस सुरु असलेल्या संततधार पावसाने आज रविवारी सुट्टीच्या दिवशी दिवसभरात काही प्रमाणात सुट्टी घेतली होती. तरीही अधून-मधून पावसाच्या मोठ-मोठ्या सरी कोसळत होत्या. आज दिवसभरात कधी ऊन तर कधी पाऊस असे समिश्र चित्र पहायला मिळाले.
![]() |
चंदगड हेरे मार्गावरील चंदगड पुलाला लागून नदीचे पाणी वाहत आहे. सायंकाळी पाच वाजता टिपलेले छायाचित्र. |
आज सकाळपासून पावसाचे प्रमाण कमी असले तरी आजही तालुक्यातील अनेक बंधारे व पुल हे पाण्याखाली असून पावसाने उसंत दिल्याने पावसाची स्थिती अशीच राहिल्यास पुर आलेल्या ठिकाणी सकाळपर्यंत पूर ओसरुन वाहतुक सुरु होण्याची शक्यता आहे.
तहसिल कार्यालयातील आपत्ती विभागातून मिळालेल्या माहीतीनुसार आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात तालुक्यात सरासरी ५६.३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्कलनिहाय पाऊस आजचा पाऊस व कंसात एकूण पासून – चंदगड ८७ (७७४), नागनवाडी ५१ (५०१), माणगाव १८ (२४९), कोवाड १५ (२८९), तुर्केवाडी ७६ (७०५), हेरे ९१ (९३५). आज सकाळपर्यंत हेरे सर्कलमध्ये सर्वांधिक ९१ मि. मि. तर सर्वांत कमी कोवाड सर्कलमध्ये १५ मि. मी झाला आहे.
चंदगड तालुक्यातील प्रकल्पातील पाणीसाठी प्रकल्पाचे नाव व कंसात टक्केवारी
तालुक्यातील सर्व प्रकल्पाची एकूण टक्केवारी सरासरीमध्ये - ७३.४३
मध्यम प्रकल्प - घटप्रभा (१०२.९४), जांबरे (१००.००) व जंगमहट्टी (४०.३५)
लघु पाटबंधारे प्रकल्प - आंबेवाडी (४८.१६), दिंडलकोप (७४.३१), हेरे (२२.३२), जेलुगडे (५२.८२), कळसगादे (५८.५२), करंजगाव (४०.००), खडकओहोळ (२८.३०), किटवाड क्र.1 (१००.००), किटवाड क्र.2 - (८०.२७), कुमरी (६९.११), लकिकट्टे (८०.७७), निट्टूर क्र.2 (३१.९८), पाटणे (४६.९१), सुंडी (६४.७१), काजिर्णे (७९.१९).
No comments:
Post a Comment