![]() |
मौजे देवरवाडी येथील मंदिर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता चंदगड तालुक्यातील मौजे देवरवाडी बेळगाव सीमा लगत असून या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे कोरोना दक्षता समिती देवरवाडी ह्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये मंगळवार दिनांक २२ जून २०२१ रोजी होणारी मरगाई देवीची यात्रा सर्वानुमते रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सदराच्या बैठकीला अध्यक्ष/सरपंच गीतांजली सुतार, उपसरपंच गोविंद आडाव, सचिव पोलीस पाटील, जयवंत कांबळे, नोडल ऑफिसर राजश्री पचांडी, कोरोना दक्षता समिती सदस्य विद्या भोगण, प्रभावती मजुकर, राजू करडे, लक्ष्मण आडाव, संजय भोगण, शंकर भोगण, लक्ष्मण भोगण, पुंडलिक कांबळे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment