पर्यटन स्थळांवर धडक कोरोना तपासणी, पर्यटकांची तारांबळ, तिघे पॉझिटिव्ह - चंदगड लाईव्ह न्युज

20 June 2021

पर्यटन स्थळांवर धडक कोरोना तपासणी, पर्यटकांची तारांबळ, तिघे पॉझिटिव्ह

 

पर्यटन स्थळावर एंटीजन चाचणी करताना.

 चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील पर्यटनस्थळांवर आलेल्या पर्यटकांची प्रशासन अधिकाऱ्यांनी धडक कोरोना तपासणी मोहीम राबविल्याने पर्यटकांची एकच तारांबळ उडाली.
रविवार साप्ताहिक सुट्टीचा दिवस आणि कोरोना पॉझिटिव्हीचा कमी आलेला दर यामुळे उत्साहित झालेल्या पर्यटकांनी चंदगड तालुक्यातील विविध पर्यटन स्थळी आज २० जून रोजी गर्दी केली होती. तथापि मनसोक्त फिरणाऱ्या किटवाड धरण, सुंडी धबधबा, तिलारीनगर, पारगड, झांबरे धरण, फाटकवाडी धरण, महिपाळगड, वैजनाथ देवस्थान, हाजगोळी- चाळोबा देवस्थान, तिलारी मुख्य धरण आदी पर्यटनस्थळांवर धडक कोरोना तपासणी कॅम्प घेणेत आला. या ठिकाणी ९४१ जनांची अँटीजेन व ६६ जणांची RTPCR  अशा एकूण १००७  तपासण्या पैकी १००४ निगेटिव्ह व ३  पॉजिटिव्ह रुग्ण आढळुन आले. या तपासणी मोहिमेत आरोग्य, महसूल, पंचायत समिती, कृषी, वन व पोलिस खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. यावेळी वीना मास्क हुंदडणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर पॉजिटिव्ह रुग्णांची रवानगी कोविड केंद्रात करण्यात आली.
पुढील काही दिवसात वर्षा पर्यटकांसह विना मास्क फिरणा-या तसेच विनापरवाना समुहाने फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट व दंडात्मक कारवाई करुन गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तरी लोकांनी विनाकारण घराबाहेर पडून कारवाईस सामोरे जाऊ नये असे आवाहन विजया पांगारकर उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज यांनी केले आहे.No comments:

Post a Comment