वाढीव वीज बिले कमी करण्याची शेकापकडून महावितरणकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

22 June 2021

वाढीव वीज बिले कमी करण्याची शेकापकडून महावितरणकडे मागणी


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुक्यातील चंदगड तालुक्यातील हलकर्णी व परिसरातील कित्येक गावातील घरगुती वीज बिले भरमसाठ वाढून आली आहेत. सर्वच घरगुती वीज बीले कमी करून देण्यात यावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस चंद्रकांत बागडी यांनी महावितरणकडे निवेदनाद्वारे केली आहे.             

         निवेदनात असे म्हटले आहे की,  हलकर्णी व परिसरातील घरगुती वीज बिले मीटर रिडींग न घेता अंदाजे काढली आहेत. हलकर्णी परिसरातील जवळपास सर्वच घरांचे  वीजेची मीटर घराबाहेर आहेत. त्यामुळे वीज वापर रिडींग सहज घेता येते. मात्र में महिन्यात महावितरणकडून रिडिंगच घेतले नाही. अंदाजे बिले काढली आहेत, तरी या प्रश्नी लोकांकडून नाराजी व्यक्त होत आहे, महावितरण कडून रिडींग घेवूनच बीले काढावीत. तसेच कोरोनाचा कालावधी लक्षात घेता वाढीव बीले कमी करून देण्यात यावी. अन्यता हलकर्णी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल असे चंद्रकांत बागडी यांनी निवेदनातून दिला आहे. 
No comments:

Post a Comment