केंचेवाडी येथील महिला बचत गटांना मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

30 June 2021

केंचेवाडी येथील महिला बचत गटांना मार्गदर्शन

 

केंचेवाडी येथे माहिला बचत गटाना मार्गदर्शन करताना मिलिंद पाटील

अडकूर / सी .एल .वृत्तसेवा
केंचेवाडी (ता .चंदगड ) येथील सर्व महिला बचत गटांना महाराष्ट्र राज्य जीवनोती (उमेद ) अभियान अंतर्गत प्रभाग समनवयक मिलिंद पाटील यांनी मार्गदर्शन केले. स्वयंमसहाय्यता गट स्थापन करून स्वतःचा विकास कसा करून घ्यावा ,ग्राम संघाची माहिती,पं दीनदयाळ रोजगार अभियान,स्टार उद्योग समूह व दुग्ध,फलोत्पादन म्हणजे काय ,परसबागेचे उपक्रम,पंचायत राज मधील गटांचा सक्रिय सहभाग,गावचे सामूहिक आरोग्य,पिणेचे पाणी ,आरोग्य व्यवस्था गटाच्या माध्यमातून कशा सोडवायच्या,गोरगरीब महिलांचे जीवनमान कसे उंचावले  पाहिजेत हे काम या उमेद अभियान अंतर्गत कसे करायचे आदी विषयावरील मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. तसेच एच डी एफ सी बँकेचे सेल्स मॅनेजर धनाजी सोनार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी सौ अलका पाटील,सौ पार्वती पाटील,सौ कांचन पाटील,सौ निर्मला निंबाळकर,सौ सरिता निंबाळकर ,यांचेसह इतर महिला सदस्या,उपस्थित होत्या.


No comments:

Post a Comment