अडकूर येथे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

04 June 2021

अडकूर येथे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ

अडकूर (ता. चंदगड)येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करताना आमदार राजेश पाटील, सोबत अभय देसाई, गंगाधर व्हसकोटी.

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

       अडकूर (ता. चंदगड) येथे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते ग्रामीण भागातील गाव अंतर्गत मुलभूत सुविधा पुरवणे योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या  विविध विकास कामांचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अभय देसाई उपस्थित होते.

          आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून अडकूरसाठी रस्ता खडीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण, गटर्स बांधकाम व फेव्हर्स ब्लॉक बसविण्यासाठी २५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर बसस्थानक ते रवळनाथ मंदिर रस्त्यासाठी ४० लाख, आपटेकर गल्लीसाठी पाच लाखांचा रस्ता इतका प्रचंड निधी आमदार राजेश पाटील यानी मंजूर केला आहे. या सर्व कामांचा शुभारंभ आज आमदार पाटील यांनी केला.

          निवडणूक काळात महिनाभर अडकूर  येथे रहायला होतो. त्यामूळे अडकूर सह परिसरातील गावांच्या विकासासाठी मी कटीबद्ध आहे. तसेच गणूचीवाडी  बंधाऱ्यासाठी २५ लाखांचा निधी ते काम पूर्ण केले आहे. याचा लाभ हजारो शेतकऱ्यांना झाला. अशीच साथ दिली तर विकासाला कमी पडणार नाही असे विचार यावेळी आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले.

         यावेळी गंगाधर व्हसकोटी, जयकुमार मन्नोळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. सासणे, शंकर परमशेट्टी, बापूसाहेब देसाई, सरपंच यशोधा कांबळे, ग्रा. सदस्य सुनिल देसाई, सदस्या सुजाता इंगवले, स्वाती माटले, सुमन शिवनगेकर, संग्राम देसाई, राहूल देसाई, सुरेश दळवी, गोपाळ आंबीटकर, महादेव शिवनगेकर, मोहन गीणची आदि मान्यवर सेवा सोसायटी सदस्य, ग्रामस्थ  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment