![]() |
जांबरे मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यातून असा पाण्याचा विसर्ग होत आहे. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
गेले तीन-चार दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यात पुरस्थिती निर्माण झाली असून अनेक बंधारे आजही पाण्याखालीच आहेत. त्यातच आज जांबरे मध्यम प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरल्याने ताम्रपर्णी नदीचा पुर वाढण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास चंदगड-हेरे मार्गही उद्यापर्यंत बंद होवू शकतो.
![]() |
विसर्ग होतानाचे छायाचित्र |
जांबरे हा मध्यम प्रकल्प हा तालुक्यातील घटप्रभा व जंगमट्टी या प्रकल्पापैकी एक मध्यम प्रकल्प आहे. दोन दिवसापूर्वी घटप्रभा (फाटकवाडी) प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला आहे. त्यानंतर आज जांबरे प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरल्याने उन्हाळ्यात शेतीसाठी याचा लाभ होणार आहे. जांबरे प्रकल्पाच्या सांडव्यातून सद्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पावसाचा जोर असाच राहिल्यास प्रकल्पातील पाण्यामुळे ताम्रपर्णी नदीची पातळी वाढणार आहे.
No comments:
Post a Comment