![]() |
संकेत शाम तंगणकर |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
माणगाव फाटा (ता. चंदगड) येथे दुचाकी घसरून रत्याशेजारी कापून ठेवलेल्या ओंडक्यावर आदळल्याने जागीच मृत्यू झाला. संकेत शाम तंगणकर (वय ३१, रा. तुरमुरी, ता. बेळगाव) असे या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी रात्री ९.१० वाजता हा अपघात घडला. संकेत हा विजयनगर (बेळगाव) येथे पाळीव प्राण्याच्या खाद्याचे दुकान चालवीत होता. कामानिमित्त तो चंदगडला गेला होता. अपघातात संकेतच्या डोकीला मार लागल्याने जागीच ठार झाला. मारुती तंगणकर यांनी चंदगड पोलिसांत वर्दी दिली. निवृत्त शिक्षक शाम तंगणकर यांचा तो मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिण, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment