प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना घरकुलच्या चाव्या देताना पदाधिकारी. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत ई-गृह प्रवेश कार्यक्रम राज्यभर एकाच वेळी पार पडला. यामध्ये चंदगड तालुक्यातील प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना त्यांच्या घराच्या किल्ल्या चंदगड पंचायत समिती येथे सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी पंचायत समिती सभापती ॲड. अनंत कांबळे उपसभापती मनीषा शिवणगेकर गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना त्यांच्या नवीन घराच्या चाव्या देण्यात आल्या. यावेळी विस्तार अधिकारी अमृता देशपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. व महा आवास अभियान यासंबंधी माहिती दिली. अडकुर येथील सुनील कुंदेकर, केंचेवाडी येथील श्रीमंता पाटील, बुझवडे येथील पांडुरंग कांबळे, वसंत कांबळे व आसगाव येथील आनंदी गावडे या लाभार्थ्यांना घरकुलाच्या चावीचे वितरण करण्यात आले.
यावेळी सभापती कांबळे म्हणाले, ``तालुक्यातील सर्व गरजू लाभार्थ्यांना घरकुल संदर्भात विविध योजना अंतर्गत आवास योजनांचा लाभ पोचवण्यासाठी प्रयत्न करावा. त्यासाठी आवश्यक ती मदत पंचायत समिती मार्फत करण्यात येईल अशी ग्वाही दिली. तर घरकुल योजने अंतर्गत तालुक्यात विस्तार अधिकारी देशपांडे यांनी राबवलेल्या कामाबद्दल उपसभापती मनीषा शिवणगेकर यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी गृह निर्माण अभियंता रज्जत हुलजी, धैर्यशील यादव, शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment