दौलत-अथर्वमध्ये रोलर पूजन, सहा लाख गाळपाचे उद्दिष्ट - चंदगड लाईव्ह न्युज

19 June 2021

दौलत-अथर्वमध्ये रोलर पूजन, सहा लाख गाळपाचे उद्दिष्ट

हलकर्णी (ता. चंदगड) येथे दौलत-अथर्व कारखान्यात मिल रोलर पूजन प्रसंगी  गुंडू गावडे,धनंजय जगताप व कर्मचारी

नंदकुमार ढेरे / चंदगड - सी. एल. वृत्तसेवा

हलकर्णी  (ता. चंदगड) येथील दौलत-अथर्व साखर कारखान्यात सन २०२१-२२ गळीत हंगामाच्या मिल रोलर पूजन कामगार संघटनेचे अध्यक्ष  गुंडू गावडे व  युनिट हेड  धनंजय जगताप यांच्या हस्ते  करण्यात आले.

     अथर्व  कंपनीने दौलत भाडे तत्वावर चालविण्यास घेतला असून कंपनीने गेले दोन गळीत हंगाम  यशस्वीरीत्या पूर्ण २०२१-२२ गळीत हंगामाकरिता व्यवस्थापनाने सहाख लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून सध्या कारखान्यात  यंत्रसामुग्रीच्या दुरुस्तीची तसेच देखभालीची कामे वेगात सुरु आहेत.तसेच साखर उत्पादनाबरोबरच इतर उप-पदार्थ निर्मितीचेही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे कारखान्याच्या सध्याच्या डिस्टीलरीचे आधुनिकीकरण करून येत्या हंगामापासून कारखानाचा इथनॉल प्रकल्प कार्यान्वित होत आहे. केंद्र सरकारने पेट्रोल मध्ये इथनॉल मिश्रणाचे धोरण स्वीकारल्यामुळे इथनॉलला बाजारात चांगली मागणी आहे. त्यामुळे कारखान्यास आर्थिक लाभ होणार असून त्याचा फायदा ऊस उत्पादकांनाच मिळणार आहे. भविष्यात इतरही प्रकल्प  विचाराधीन असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

    यावेळी केन मॅनेजर एस. एन, गदळे, चिफ केमिस्ट एस. एस. जाधव, डिस्टिलरी मॅनेजर एस. एन. माने, डिस्टिलरी इनचार्ज एस. एस. पाटील, डे.  चिफ इंजिनिअर बी. ए. पाटील, डे. फायनान्स मॅनेजर ओंकार शिंदे, कारखान्यातील इतर सर्व अधिकारी व कर्मचारी  उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment