चंदगड तालुक्यातील किल्ले पारगडवर शिवराज्यभिषेक दिन साधेपणाने साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

06 June 2021

चंदगड तालुक्यातील किल्ले पारगडवर शिवराज्यभिषेक दिन साधेपणाने साजरा

किल्ले पारगड (ता. चंदगड) येथे शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित छ.शिवरायाच्या पुतळ्याला पूष्पाहार अर्पण करताना पांडूरंग बेनके.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजरे कार्वे शहीद जवान वेलफेअर फौंडेशन, शिवनेरी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व पारगड ग्रामस्थांच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक किल्ले पारगड (ता. चंदगड) येथे शिवराज्याभिषेक सोहळा कोरोनाचे नियम पाळून साधेपणाने साजरा करण्यात आला.

       जगासह भारतभर कोरोनाच्या महामारीमुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. याचा मोठा धोका महाराष्ट्राला पोहचला आहे. यामुळे केंद्र शासनाच्या आदेशाने महाराष्ट्र शासनाने संचारबंदी लागू केली आहे. महाराष्ट्रात कोणतेही धार्मिक कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास बंदी घातली आहे. त्याच अनुषंगाने दरवर्षी खास. संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडासह अनेक ठिकाणी मोठया उत्साहात होणारा शिवराज्याभिषेक सोहळा यावर्षी साधेपणाने साजरा करण्यात आला. त्याच अनुषंगाने आज चंदगड तालुक्यातील किल्ले पारगड या ठिकाणी हा सोहळा ठराविक मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

       प्रारंभी गडाच्या पायऱ्याचे पूजन ग्रामपंचायत सदस्य जयवंत हारकारे यांच्या हस्ते करण्यात आले. निवृत्ती हारकारे व नारायण गडकरी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्यांनतर शिवप्रेमीनी केलेल्या जय भवानी, जय शिवाजी च्या जयघोषात भंडारा उधळण करत शिव प्रतिमेला जलाभिषेक करण्यात आला. पुष्पहार अर्पण करून मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग बेनके यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर भवानी मंदिरात आरतीचा कार्यक्रम पार पडला. अशा रीतीने लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करत अगदी साधेपणाने यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला.  यावेळी रघुवीर शेलार, दिलीपत कदम, पांडूरंग कांबळे, दिलीप कदम, विलास कागणकार, विनायक गडकरी, सचिन मालुसरे, प्रकाश चिरमुरे, महेश पवार, सदानंद कांबळे  ग्रामस्थ व युवक वर्ग उपस्थित होते.

No comments:

Post a Comment