अडकूर (ता. चंदगड) येथे शिवराज्याभिष दिन साजरा करण्यात आला.
अडकूर / सी. एल. वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन दि.६ जून रोजी साजरा करण्यात येतो. आज अडकुर येथे शिवराज्याभिषेक निमित्ताने छ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जगन्नाथ इंगवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सेक्रेटरी सुरेश दळवी यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने शिवराज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केल्यामुळे अडकुरच्या सरपंच श्रीमती यशोधा कांबळे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर गुढी उभारून त्याचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास उपसरपंच अनिल कांबळे, माजी उपसरपंच गणेश दळवी,ग्रामसेवक श्रीकांत सोनार,ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,धोंडिबा कांबळे,पोलीस पाटील गुरव,शिवराज देसाई,संजय देसाई जय शिवराय क्रीडा मंडळाचे सुशांत परीट, अनुज पाटील,अनिल देसाईआणि अडकुरचे ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment