संभाजीराजेंच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेला चंदगड वासीयांचा पाठिंबा, पारगडवर शिवराज्याभिषेक दिनी आरक्षणासाठी फुंकले रणशिंग - चंदगड लाईव्ह न्युज

06 June 2021

संभाजीराजेंच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेला चंदगड वासीयांचा पाठिंबा, पारगडवर शिवराज्याभिषेक दिनी आरक्षणासाठी फुंकले रणशिंग

किल्ले पारगड : येथे मराठा समाजाला आरक्षण मिळवणारच अशी वज्रमूठ आवळून प्रतिज्ञा करताना.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठो किल्ले पारगड येथे भवानी मातेच्या  मंदिर परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर  मशाल प्रज्वलित करून आरक्षण मिळवणारच अशी भीष्म प्रतिज्ञा सखल मराठा बांधवांनी घेतली. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सोशल  डिस्टन्सचे पालन करण्यात आले. 

      एक मराठा, लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, जय भवानी, जय शिवराय अश्या घोषणा देण्यात आल्या.  किल्ले रायगडावर छत्रपती संभाजीराजे यांनी जाहीर केलेल्या मराठा आरक्षण भूमिकेला चंदगड वाशीय मराठा बांधवांनी  पाठिंबा जाहीर केला. यावेळी बोलतांना  समन्वयक प्रा. दीपक पाटील म्हणाले, गट, तट, राजकारण बाजूला ठेवून मराठा आरक्षण मिळेपर्यंत खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेला पाठिंबा असेल, पेटवलेली मशाल प्रत्येक गावात मशालरूपी विचार पोहोचवले जाणार आहेत. या पुढे आंदोलन उग्र करणार असल्याचे सांगितले. अध्यापक गोविंद पाटील म्हणाले, आमच्या हक्काचे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही लढा थांबवणार नाही. यामध्ये मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे सांगितले. भारत गावडे, प्रताप डसके, राजू पाटील, रघुवीर शेलार यांची भाषणे झाली. या वेळी उपसरपंच पांडुरंग बेनके, सचिन मालुसरे, नारायण गडकरी, प्रकाश चिरमुरे, एकनाथ शेलार यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 



No comments:

Post a Comment