मान्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनासोबतच वनहत्तीचा कळप चंदगड तालुक्यात दाखल, वाचा कोणत्या गावात झाले दर्शन......... - चंदगड लाईव्ह न्युज

06 June 2021

मान्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनासोबतच वनहत्तीचा कळप चंदगड तालुक्यात दाखल, वाचा कोणत्या गावात झाले दर्शन.........

खालसा गुडवळे येथे दाखल झालेला हत्तीचा कळप.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      मान्सूनच्या महाराष्ट्रतील आगमना सोबतच वनहत्तीचा कळप चंदगड वनपरिक्षेत्रात दाखल झाला आहे. मान्सून पूर्व शेतीच्या मशागतीची तयारी शेतकर्‍यांच्या कडून करण्यात येत असतानाच हत्तींचा कळप चंदगड तालुक्यात दाखल झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. 

         जागतिक पर्यावरण दिन आणि वेळी आधिच महाराष्ट्रत दाखल झालेल्या मान्सून पावसा सोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात वनहत्तीच्या कळपाचे आगमन झाले आहे. गेल्या तीन महिन्यापासून कोकणात स्थिरावललेल्या वनहत्तीच्या कळपाचे या वर्षी नेहमीपेक्षा लवकरच चंदगड वनपरिक्षेत्रात आले आहेत. दर वर्षी साधारण ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये चंदगड तालुक्यात हत्तीच्या कळपाचे आगमन होते. परंतु या वर्षी हत्तीचा कळप जुन महिन्यातच दाखल झाला आहे असे  चंदगड वनपरिक्षेत्रचे अधिकारी डी. जी. राक्षे यांनी सांगितले. या हत्तींच्या कळपामध्ये चार हत्ती असनू त्या मध्ये १  नर, १ मादी आणि २ पिले आहेत. मौजे (खा. गुडवळे) येथे वन कर्मचाऱ्यांना गस्तीवर जंगल फिरती करत असताना हत्तीच्या कळपाचे दर्शन झाले. वनविभाग चंदगडचे गस्ती पथक हत्तीच्या कळपाचे मार्गावर असनू ग्रामस्थांनी वन विभागास सहकार्य करावे. हत्तीचा कळप निदर्शनास  आल्यास तात्काळ वन विभागास कळवावे असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे. 






फोटो . .ओळी 


No comments:

Post a Comment