चंदगडच्या गटशिक्षणाधिकारी सौ. सुभेदार यांना राजर्षी शाहू पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

11 June 2021

चंदगडच्या गटशिक्षणाधिकारी सौ. सुभेदार यांना राजर्षी शाहू पुरस्कार

जिल्ह्यातील अन्य सोळा कर्मचाऱ्यांची  निवड 

सौ. एस. एस. सुभेदार

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 
  चंदगड तालुक्याच्या कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी सौ. एस. एस. सुभेदार यांची मानाच्या राजश्री शाहू पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
गटशिक्षणाधिकारी सौ. सुभेदार यांचे पुरस्काराबद्दल अभिनंदन करताना पंस.चंदगड चे कर्मचारी.

   जि. प. च्या विविध योजना राबवण्यात कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असते. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून जिप. कोल्हापूर ने २०२०-२१ पासून कर्मचाऱ्यांसाठी राजर्षी शाहू तर पत्रकारांसाठी आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार सुरू केले आहेत. या वर्षी उत्कृष्ट कर्मचारी म्हणून जिल्ह्यातील सोळा कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यात चंदगड तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सौ सुमन शिवाजी सुभेदार यांची अग्रक्रमाने निवड झाल्यामुळे चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद कर्मचारी वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरस्कार वितरण राजर्षी शाहू जयंती दिनी होणार असून गौरवचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांची निवड दिनांक ११ जून  रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत करण्यात आली. यावेळी अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपाध्यक्ष सतीश पाटील, सर्व समित्यांचे सभापती, जि प सदस्य व अधिकारी उपस्थित होते. 
   सौ एस एस सुभेदार यांच्या व्यतिरिक्त अन्य पुरस्कार प्राप्त कर्मचारी पुढील प्रमाणे नारायण बबन चांदेकर अधीक्षक सामान्य प्रशासन, प्रशांत पांडुरंग पाटील वरिष्ठ सहाय्यक, आनंदा पांडुरंग चव्हाण वाहन चालक, सुभाष गणपतराव लांबोरे ग्रामपंचायत, संभाजी रामचंद्र हंकारे सहाय्यक लेखाधिकारी, शांताराम शामराव पाटील सहाय्यक लेखा अधिकारी (सर्व जि प कार्यालय कोल्हापूर). नंदकुमार मारुती पार्टे कनिष्ठ सहाय्यक, संतोष आनंदराव पाटील सहाय्यक अभियंता (पंचायत समिती राधानगरी) शिवाजी रामचंद्र कोळी कृषी विस्ताराधिकारी (शिरोळ), विनायक मारुती पाटील पशुधन पर्यवेक्षक (गडहिंग्लज), प्रवीण प्रकाश मुळीक आरोग्य सेवक (प्रा आ केंद्र इस्पुरली, करवीर),  अमोल विठ्ठल कोळी आरोग्य सहाय्यक केंद्र (प्रा आ केंद्र टाकळी ता शिरोळ) अनघा दिलीप पाटील आरोग्य सेविका (प्राआ केंद्र भुये ता करवीर) बेबीताई वसंत घोलप (आरोग्य सहाय्यिका करंजफेन ता शाहूवाडी) रामचंद्र श्रीपती गिरी औषध निर्माण अधिकारी (प्रा आ केंद्र मिणचे भुदरगड) यांचा समावेश आहे.No comments:

Post a Comment