चंदगड तालुक्यातील 3289 गरोदर मातांना आठवड्याभरात कोरोना लस, आरोग्य विभागाकडून तयारी - चंदगड लाईव्ह न्युज

17 July 2021

चंदगड तालुक्यातील 3289 गरोदर मातांना आठवड्याभरात कोरोना लस, आरोग्य विभागाकडून तयारी

 


कागणी : सी. एल. वृत्तसेवा

 कोल्हापूर जिल्ह्यात आता पुढील आठवड्यापासून गरोदर मातांना प्राधान्य देत कोरोना लस देण्याची तयारी आरोग्य विभागाकडून सुरू आहे. चंदगड तालुक्यामधील 3289 गरोदर मातांना लस देण्यात येणार आहे. तर जिल्ह्यात 68 हजार 348 गरोदर मातांना लस देण्याची तयारी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर तसेच 60 वर्षावरील नागरिक यांना लस देण्यात येत होती. त्यानंतर 45 वर्षावरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला. महिनाभरापूर्वी 18 वर्षावरील नागरिकांना द्यायचा निर्णय होता, मात्र लस उपलब्ध नसल्याने आता यात बदल करून प्रथम प्राधान्याने गरोदर मातांना लस देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. यासाठी संबंधित महिलांनी गावातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी व आरोग्य सेविका तसेच स्थानिक शासकीय दावाखान्यामध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:

Post a Comment