माजीमंत्री भरमूअण्णा यांचेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत, अतिवृष्टीने नुकसानीची पाहणी, मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2021

माजीमंत्री भरमूअण्णा यांचेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत, अतिवृष्टीने नुकसानीची पाहणी, मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन

माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         माजी रोहयोमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी महापुरात बुडुन मयत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांचे घरी जाऊन सांत्वन केले. याबरोबरच कर्यात भागात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती व घरे यांची पाहणी केली.

  कोरोना विषाणूमुळे आलेल्या आपत्ती निवारणासाठी माजी विधिमंडळ सदस्यांसाठी असलेले जुलै महिन्याचे निवृत्ती वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी निधीकडे वर्ग केले. 

          चार दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत कडलगे नजीकच्या ओढ्यातून वाहून गेलेल्या अभिषेक संभाजी पाटील रा. नागरदळे व सुनिता पांडुरंग कंग्राळकर रा. तळगुळी यांच्या घरी जाऊन नातेवाईकांचे सांत्वन केले. याच बरोबर चंदगड तालुक्याच्या पूर्व भागात अतिवृष्टी व पुरामुळे घरे व शेतीचे नुकसान झालेल्या कुदनुर, दिंडलकोप, कालकुंद्री, कागणी, किणी, नागरदळे आदी गावांत भेट देऊन पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करून पुढील मदत मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांच्यासोबत माजी सभापती यशवंत सोनार, राम पाटील आदींची उपस्थिती होती.
No comments:

Post a Comment