भात रोप लागणीची धावपळ, अबालवृद्ध शेतात, पाऊस मात्र गायब - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2021

भात रोप लागणीची धावपळ, अबालवृद्ध शेतात, पाऊस मात्र गायब

भात रोप लावणीच्या कामामध्ये भाताच्या रोपांची पेंडी वाहून नेताना हा उत्साळी येथील चिमुकला रोनक

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड पश्चिम भागात भात रोप लागणीची  प्रचंड धावपळ  उडाली आहे. मजुरांचा तुटवडा भासत असल्याने कुंटुबातील अबाल- वृद्ध सर्वजनच शेती कामात व्यस्थ आहेत. पाऊस मात्र गायब झाल्याने शेतकरी चिंताग्रस्थ आहे.

      चंदगड तालूक्याच्या जवळपास सर्व भागातोल म्हणजे अडकूर, माणगाव, चंदगड, कानूर पासून ते शिनिळी तुडये पर्यंत भाताची रोप केली जाते. तालूक्याच्या फक्त कर्यात भागात धूळवाफ पेरणी केली जाते. सध्या पावसाने ओढ दिली असली तरी सर्वत्र नदि, तलाव, विहीर, ओढा, बोअरवेल आदिच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून घेऊन रोपलागण केली जात आहे. या बरोबरच बैल, रोटर, ट्रॅक्टर बरोबरच अत्याधुनिक साधनांचा वापर करून रोप लागण करण्याचा प्रयत्न शेतकरी करत असला तरी सर्वत्रच मजूरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे घरात असणाऱ्या सर्व बाल वृद्धानाही शेतीच्या रोपलावणीच्या कामाला हातभार लावावा लागत आहे. सध्या शाळा बंद असल्याने आपोआपच सर्व मुले शेतातच आहेत. ग्रामिण भागातही ऑनलाईन शिक्षण चालू असले तरी आई वडीलासोबत शेतात काम करणाऱ्या मुलांचे कोठले आले ऑनलाईन शिक्षण? सध्या तरी विद्यार्थी शाळेत नाहीत तर शेतात असल्याचे दृष्य चंदगड तालूक्यात दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment