![]() |
चंदगड तहसिलदारांना निवेदन देताना. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) च्या परीक्षा होत नसल्यामुळे महाराष्ट्रात विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. याच निराशेतून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकर याला न्याय मिळावा व परीक्षा लवकर घेऊन पदांची भरती व्हावी आदी मागण्यांसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा या विद्यार्थी संघटनेच्या वतीने ७ जुलै रोजी राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात आले.
चंदगड तालुका शाखेच्यावतीने तहसीलदार विनोद रणवरे यांना निवेदन सादर करून आंदोलन व निदर्शने करण्यात आली. यात मोर्चाचे तालुका प्रभारी गौतम मोरे, अमोल कांबळे, श्रीनिवास कांबळे, रोहित जोशिलकर आदींसह ऑफशुट विंग (बहुजन क्रांती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ठ) चे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मोर्चाच्या वतीने स्वप्नील लोणकर च्या परिवाराला शासनाने एक कोटी रुपये आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, एम. पी. एस. सीसह अन्य शासकीय रिक्त पदांची भरती तात्काळ सुरू करावी, कोरोनामुळे 'एज बार' झालेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे मुदतवाढ द्यावी, कोरोनामुळे विस्कटलेली अंगणवाडी ते महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्था तात्काळ सुरळीत करावी. अशा संघटनेच्या संघटनेच्या अन्य मागण्या असून याची तात्काळ पूर्तता न केल्यास महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांत उग्र आंदोलनाचा इशारा भारतीय विद्यार्थी मोर्चा ने दिला असून याबाबतची निवेदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संबंधित मंत्री, सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आली आहेत.
No comments:
Post a Comment