पदोन्नती आरक्षण रद्दच्या विरोधात ओबीसींचे आंदोलन, तहसिलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2021

पदोन्नती आरक्षण रद्दच्या विरोधात ओबीसींचे आंदोलन, तहसिलदारांना निवेदन

 


चंदगड येथे तहसीलदार रणवरे यांना आंदोलनाबाबत चे पत्र देताना RMBKS चे कार्यकर्ते.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

            शासनाने ओबीसी जातीचे पदोन्नती मधील आरक्षण काही दिवसांपूर्वी रद्द केले आहे. याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ RMBKS यांच्या वतीने दि. ८ ते २३ जुलै पर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून चंदगड तालुका राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ शाखेच्या वतीने तहसीलदार विनोद रणवरे यांना आंदोलनाबाबतचे निवेदन दि. ७ रोजी देण्यात आले. यावेळी धोंडीबा बामणे. सुनील कांबळे, राहुल मोरे, अमित तरवाळ आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment