चंदगड तालुक्यात पावसाच जोर वाढला, घरांची पडझड होवून १ लाख ६० हजारांचे नुकसान, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ - चंदगड लाईव्ह न्युज

21 July 2021

चंदगड तालुक्यात पावसाच जोर वाढला, घरांची पडझड होवून १ लाख ६० हजारांचे नुकसान, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

 


संपत पाटील / चंदगड - सी. एल. वृत्तसेवा

         गेले दोन-तीन दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. वादळी वाऱ्यासह दिवसभर संततधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चंदगड तालुक्यात गेल्या चोवीस तासात सरासरी ३३.८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

         संततधार पडणाऱ्या पावसामुळे कानुर बुद्रुक येथे धोंडीबा शिवराम गावडे यांच्या घरावर झाड पडुन अंदाजे रू १ लाखाचे नुकसान झाले  तर मारूती आप्पा नाईक यांची भिंत पडून अंदाजे २० हजार रुपयांचे नुकसान झाले. आज सकाळी नऊ वाजता कानुर बुद्रुक येथील कृष्णा गोविंद गावडे यांच्या घरावर झाड पडुन अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. पाऊस व वादळी वाऱ्यामुळे दिवसभरात सुमारे १ लाख ६० हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा पाऊस रोपलावणीसाठी उपयुक्त ठरला आहे. मुसळधार पावसामुळे शिवारातील पाण्याचे प्रवाह बदलल्याने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. 

       चंदगड तहसिल कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागातून मिळालेल्या माहीतीनुसार आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात सरासरी ३३.८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील सर्कलनिहाय पाऊस असा सर्कलचे नाव, आजची आकडेवारी कंसात १ जून २०२१ पासून आतापर्यंतची आकडेवारी – चंदगड - ४८ (१०५८), नागनवाडी – ३८ (७१७), माणगाव – १५ (३३६), कोवाड – २२ (४०५), तुर्केवाडी - २५ (८९२), हेरे - ५५ (१२७९). तालुक्यामध्ये आतापर्यंत सर्व सर्कलमध्ये ४६८७ मिलीमीटर पावासाची नोंद झाली असून सरासरी ७८१.१७ एवढी आहे. 

          चंदगड तालुक्याच्या प्रकल्पातील पाणीसाठा......

मध्यम प्रकल्प – घटप्रभा (१०४.३४), जांबरे (१००), जंगमहट्टी (४९.०९).

लघुपाटबंधारे प्रकल्प – आंबेवाडी (५९.३६), दिंडलकोप (१००), हेरे (५२.७३), जेलुगडे (८६.८७), कळसगादे (१००), करंजगाव (४६.७४), खडकओहोळ (४३.८३), किटवाड क्र. १ (१००), किटवाड क्र. २ (१००), कुमरी (७७.२२०), लकीकट्टे (८८.९१), निट्टूर क्रं. २ (४१.६९), पाटणे (७१.५५), सुंडी (१००), काजिर्णे (१००). 


No comments:

Post a Comment