गटशिक्षणाधिकारी सौ. सुभेदार यांचा पुरस्काराबद्दल पंचायत समिती सभेत सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

07 July 2021

गटशिक्षणाधिकारी सौ. सुभेदार यांचा पुरस्काराबद्दल पंचायत समिती सभेत सत्कार

गटशिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार यांचे पुरस्काराबद्दल सत्कार करताना पं. स. चंदगडचे सभापती उपसभापती व गटविकास अधिकारी.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

          चंदगड तालुक्याच्या कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी सौ एस एस सुभेदार यांची मानाच्या राजश्री शाहू पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल पंचायत समिती चंदगडच्या मासिक सभेत सत्कार करण्यात आला.

          जि. प. च्या विविध योजना राबवण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असते. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून जिप. कोल्हापूरने २०२०-२१ पासून राजर्षी शाहू पुरस्कार सुरू केला आहे. 

       या वर्षी उत्कृष्ट अधिकारी म्हणून चंदगड तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सौ सुमन शिवाजी सुभेदार यांची निवड झाल्यामुळे चंदगड पंचायत समिती वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. पुरस्काराचे औचित्य साधून

        चंदगड पंचायत समिती सभागृहात आज सभापती आनंत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत सुभेदार यांचा यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी उपसभापती मनीषा शिवणगेकर, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, पंचायत समितीचे सर्व सदस्य, विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment