ओलम (हेमरस) चे रोलर पूजन, सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट तर गडहिंग्लज विभागात उच्चांकी दर देणार - भरत कुंडल - चंदगड लाईव्ह न्युज

07 July 2021

ओलम (हेमरस) चे रोलर पूजन, सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट तर गडहिंग्लज विभागात उच्चांकी दर देणार - भरत कुंडल

ओलम (हेमरस) साखर कारखान्याचे रोलर पूजन करताना प्रोसेस हेड शशांक शेखर, बिजनेस हेड भरत कुंडल व इतर मान्यवर

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

           चंदगड तालुक्यातील ओलमचे (हेमरस) सन २०२१-२२ सालाच्या गळीत हंगामासाठी रोलर पूजन ओलम कारखान्याचे प्रोसेस हेड शशांक शेखर यांच्या हस्ते तर बिजनेस हेड भरत कुंडल, मुख्य शेती अधिकारी सुधिर पाटील, टेक्नीकल हेड संजय टोमर, एच. आर. हेड अझीझ झंझानी यांच्या उपस्थितीत झाले. 

         यावर्षी  एप्रिल आणी मे महिन्यामध्ये पाऊस झाल्यामुळे भागात ऊस पिकाची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे यावर्षी वाढीव ऊस पिकाचे उत्पन्न अपेक्षित आहे. तसेच ऊस तोडणी साठी लागणारी तोडणी वाहतूक यंत्रणा करार करून घेण्यात आले आहेत. येणारा गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चालू करण्यात येणार असून कारखान्यातील  दुरुस्थीची कामे चालू आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा ओलम (हेमरस) गडहिंग्लज विभागात ऊस दर उचांकी देणार आहे. आजपर्यंत ओलमने (हेमरस) वेळोवेळी ऊस व तोडणी वाहतूकदार यांची बिले देऊन भागात विश्वास संपादन केला आहे. यावर्षी शेती विभागाकडे 24662 ऊस उत्पादक शेतकऱ्याची 13258 हेक्टर ऊसाची नोंद ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे असे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी सांगितले. 

          यावेळी युनियन अध्यक्ष संताराम गुरव, युनियम सेक्रेटरी रवळनाथ देवाण, अनिल पाटील यांच्यासह कारखान्यातील पदाधिकारी, कामगार शेती विभागातील पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment