तालुक्यात पावसाचा धुमाकुळ, पडझडीमुळे दिड लाखांचे नुकसान, अनेक बंधारे व पुल पाण्याखाली, वाहतुक विस्कळीत, एकजण गेला वाहून - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2021

तालुक्यात पावसाचा धुमाकुळ, पडझडीमुळे दिड लाखांचे नुकसान, अनेक बंधारे व पुल पाण्याखाली, वाहतुक विस्कळीत, एकजण गेला वाहून

पाण्याखाली गेलेला पिळणी (ता. चंदगड) येथील बंधारा.

संपत पाटील / चंदगड - सी. एल. वृत्तसेवा      

        गेले दोन-तीन दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे चंदगड तालुक्यातील घटप्रभा नदीवरील पिळणी,बिजूर भोगोली, हिंडगाव, कानडी सावरडे,अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर ताम्रपर्णी नदीवरील चंदगड, माणगांव, कुर्तनवाडी, कोवाड, हल्लारवाडी बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चंदगड-हेरे मार्गावर पुलावर पाणी आले आहे. कडलगे -ढोलगरवाडी (ता. चंदगड) या दोन्ही गावालगत असणाऱ्या ओढ्याला आलेल्या पुरातुन नागरळे येथील अभिषेक संभाजी पाटील (वय -२६) हा युवक दुचाकीसह वाहून गेला. तर याच दुचाकीवरून प्रवास करणारा शशिकांत संभाजी पाटील हा युवक सुदैवाने बचावला.

बुझवडे येथील निंगाप्पा कांबळे यांच्या घराची भिंत पडल्याने नुकसान झाले. 

      दिवसभर वादळी वाऱ्यासह दिवसभर संततधार पाऊस सुरुच आहे. आज सकाळपासून पावासाचा जोर वाढल्याने शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. चंदगड तालुक्यात गेल्या चोवीस तासात सरासरी ३३.८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात सरासरी ७६.१७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

           संततधार पडणाऱ्या पावसामुळे मौजे तडशिनहाल येथील महादेव गणू कांबळे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. डुक्करवाडी येथील संभाजी यादव यांचे घराची पडझड होवून तीस हजारांचे नुकसान झाले आहे. बुझवडे येथील निंगाप्पा धोंडीबा कांबळे यांच्या घराची भिंत पडून ७० हजारांचे नुकसान झाले आहे. हलकर्णी येथील ख्रिश्चन समाजाची विहीर कोसळून नुकसान झाले आहे. असे आज दिवसभरात वादळी वारे व पावसामुळे दिड लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

       चंदगड तहसिल कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागातून मिळालेल्या माहीतीनुसार आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात सरासरी ७६.१७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील सर्कलनिहाय पाऊस असा सर्कलचे नाव, आजची आकडेवारी कंसात १ जून २०२१ पासून आतापर्यंतची आकडेवारी – चंदगड - ९० (११४८), नागनवाडी – ७१ (७८८), माणगाव – ६२ (३९८), कोवाड – ४८ (४५३), तुर्केवाडी - ८७ (९७९), हेरे - ९९ (१३७८). तालुक्यामध्ये आतापर्यंत सर्व सर्कलमध्ये ५१४४ मिलीमीटर पावासाची नोंद झाली असून सरासरी ८५७.३३ एवढी आहे. 

               तळगोळी येथील महिला गेली वाहून, दुसरी घटना

     कार्वे कडून घुल्लेवाडी मार्गे तळगोळी कडे जात अस्ताना घुलेवाडी व निटटूर या मधिल ओढा पत्रातू सायंकाळी ६.४५ वाजता सुनिता पांडूरंग कग्राळकर  (रा. तळगोळी, ता. चंदगड) ही महिला वाहून गेली.


      घटप्रभा धरणाच्या पाणलोट क्षेञामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे   त्यामुळे घटप्रभा धरणाच्या सांडव्यावरुन १४७१९ क्युसेक्स व पाँवर हाऊस मधून ९०० क्युसेक्स असा एकूण १५६१९ क्युसेक्स इतका विसर्ग घटप्रभा नदीमध्ये दुपारी ४.०० वाजलेपासून चालू आहे. घटप्रभा (फाटकवाडी) धरण प्रशासन.......

        ताम्रपर्णी नदीवरील जांबरे धरणाच्या पाणलोट क्षेञामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे   त्यामुळे जांबरे धरणाच्या सांडव्यावरुन ३११५.०७० क्युसेक्स इतका विसर्ग ताम्रपर्णी  नदीमध्ये सं. ६.०० वाजलेपासून चालू आहे. तसेच जेलुगडे,पाटणे, हेरे हे ल.पा.तलाव रात्री भरुन विसर्ग वाढू शकतो. जांबरे धरण प्रशासन......


चंदगड तालुक्याच्या प्रकल्पातील पाणीसाठा............

मध्यम प्रकल्प – घटप्रभा (१०८.०५), जांबरे (१००), जंगमहट्टी (५२.०५).

लघुपाटबंधारे प्रकल्प – आंबेवाडी (६०.३८), दिंडलकोप (१००), हेरे (५६.७३), जेलुगडे (९८.९९), कळसगादे (१००), करंजगाव (४७.३१), खडकओहोळ (४२.८२), किटवाड क्र. १ (१००), किटवाड क्र. २ (१००), कुमरी (८१.०८), लकीकट्टे (९१.१९) निट्टूर क्रं. २ (४७.९२), पाटणे (७५.२१), सुंडी (१००), काजिर्णे (१००). 




No comments:

Post a Comment