पाण्याच्या प्रवाहामुळे नागरदळे येथील एअर इंडियाचा जवान कडलगेच्या ओढ्यातून गेला वाहून, चंदगड तालुक्यातील घटना, वाचा........ - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2021

पाण्याच्या प्रवाहामुळे नागरदळे येथील एअर इंडियाचा जवान कडलगेच्या ओढ्यातून गेला वाहून, चंदगड तालुक्यातील घटना, वाचा........

पुराच्या पाण्यातून वाहून गेलेला अभिषेक संभाजी पाटील

एस. के. पाटील / तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा

       कडलगे-ढोलगरवाडी (ता. चंदगड) या दोन्ही गावालगत असणाऱ्या ओढ्याला आलेल्या पुरातुन नागरळे येथील अभिषेक संभाजी पाटील (वय -२६) हा युवक दुचाकीसह वाहून गेला. तर याच दुचाकीवरून प्रवास करणारा शशिकांत संभाजी पाटील हा युवक सुदैवाने बचावला. हि घटना सायंकाळी चारच्या दरम्यान घडली.

       यासंदर्भात माहीती अशी - अभिषेक हा आपल्या मित्रासोबत काही कामानिमित्य ढोलगरवाडीला गेला होता. तेथून आपल्या नागरदळे गावी परतत असताना कडलगेच्या ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज आला नाही. ओढा पार करताना स्पेंडर गाडी पाण्यात जाताच पाण्याच्या प्रचंड वेगाने ती एका बाजुला कलंडली. यामध्ये अभिषेक पाण्याच्या प्रवाहाने वाहून जात होता. त्यावेळी अभिषेकला पकडून ठेवण्याचा प्रयत्न शशिकांतने केला. पण पाण्याच्या प्रचंड वेगामुळे त्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने अभिषेक पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. पाण्याबाहेर असणाऱ्या काही युवकांनी शशिकांत व गाडीला पाण्यातून ओढून सुरक्षित बाहेर काढले. युवक वाहून गेल्याची बातमी परिसरात कळताच ओढा परिसरात शोध मोहिम राबविण्यात आली. पण सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. या घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाटील यांनी यासंदर्भात प्रशासनास सुचना केल्या आहेत. तर कोवाड पोलिस चौकीचे पो. कॉ. कुशाल शिंदे यानी घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहीम राबवली.

                                 दुर्दैवी अभिषेक 

         सैन्यदलात दाखल होऊन भारतमातेची सेवा करण्याचे स्वप्न अभिषेकने उराशी  बाळगले होते. त्यानुसार  भारतिय एअर इंडियामध्ये आभिषेक जॉईन होऊन गेल्या दोन वर्षापासून सेवा बजावत आहे. तो सुट्टीवर गावी आला होता. पण ड्यूटी जॉईन करण्यापूर्वीच तो पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सुदैवाने तो सुरक्षित रहावा अशीच सर्वजन प्रार्थना करत आहेत.

No comments:

Post a Comment