कोल्हापूरात एनडीआरएफच्या दोनतुकड्या दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2021

कोल्हापूरात एनडीआरएफच्या दोनतुकड्या दाखल

 

कोल्हापूरात दाखल झालेली एनडीआरएफची टिम

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

      कोल्हापूर जिल्हात कालपासून कोसळणाऱ्या धो-धो पावसामुळे पुरपरिस्थिती गंभिर बनत चालली आहे. २०१९ सालच्या पुराचा उनुभव लक्षात घेता प्रशासनाने दोन एनडीआरएफच्या तुकडया पाचारण केल्या होत्या. आज या दोन्ही तुकडया कोल्हापूरात दाखल झाल्या.

        राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन रेस्कू फोर्स अर्थात NDRF च्या एका तुकडीत २५ जवान अशा दोन तुकडया दाखल झाल्या आहेत. शिरोळ तालूक्यासाठी यातील एक तुकडी काम करणार असून दुसरी तुकडी कोल्हापूर शहर व परिसरात कार्यरत  राहणार  आहे. सध्या पंचगंगेने ३९ ही इशारा पातळी ओलांडली आहे. सध्या पंचगंगेची वाटचाल धोक्याच्या पातळीकडे चालू असल्याने प्रशासन सतर्क आहे. ८० हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले असल्याने पुरस्थिती गंभीर बनत चालली आहे.

No comments:

Post a Comment