निटटूर-घुल्लेवाडी ओढ्याच्या पाण्यातून महिला गेली वाहून, दोघांना वाचविण्यात यश, चंदगड तालुक्यातील एकाच दिवसातील दुसरी घटना.......... - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2021

निटटूर-घुल्लेवाडी ओढ्याच्या पाण्यातून महिला गेली वाहून, दोघांना वाचविण्यात यश, चंदगड तालुक्यातील एकाच दिवसातील दुसरी घटना..........

निटटूर-घुल्लेवाडी दरम्यानचा ओढा

एस. के. पाटील / तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालूक्यातील कार्वे या गावावरून घुल्लेवाडी मार्गे कोवाड तळगुळीकडे जात असताना घुल्लेवाडी व निटटूर दरम्यानच्या ओढ्यावरुन जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहामुळे तीघेजन वाहून जात होते. त्यापैकी दोघांना वाचविण्यात यश आले तर एक महिला मात्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली. सुनिता पांडूरंग कग्राळकर (रा. तळगुळी) असे वाहून गेलेल्या महिलेचे नाव आहे. हि घटना आज (गुरुवार दि. २२ जुलै रोजी) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली.

          यासंदर्भात मिळालेली माहीती अशी - यामध्ये सुनिता पांडूरंग कग्राळकर (रा. तळगुळी) ही महिला वाहून गेली असून सौरभ पांडूरंग कग्राळकर व यलुबाई तुकाराम कंग्राळकर या दोघांना वाचवण्यात यश आले आहे.कोवाड पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी साडेसहा वाजता घुल्लेवाडी गावातील शेतकरी हे निट्टुर घुल्लेवडी दरम्यानच्या ओढ्यावरील पुलावरून जात होते. मात्र सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पुर आल्याने ओढ्यावरुन पाणी वाहत होते. हा पूल पार करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने  सौरभ पांडुरंग कंग्राळकर (वय-१९) व कल्पना तुकाराम कंग्राळकर (वय -५०) तसेच सुनीता पांडुरंग कंग्राळकर (वय ३८) हे वाहून जात होते. मात्र त्यातील सौरभ व कल्पना यांना वाचवण्यात यश आले असून सुनीता हिला प्रयत्न करूनही वाचवण्यात अपयश आले. त्या ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्या. सदर तीनही व्यक्ती तळगुळी गावचे रहिवासी आहेत. 
          दरम्यान आज पूर्ण दिवस मौजे घुल्लेवाडी गावचे सरपंच युवराज पाटील व सदस्य नारायण गिरी, पोलीस पाटील भागोजी पाटील आणि दक्षता कमिटी ही अशा घटना घडू नये म्हणून बंदोबस्तासाठी थांबलेले होते. या सर्वानी वाहतूक थांबवून वाहतूक बंद असल्याबाबतचे फोटो सुर्यकांत पाटील यांनी प्रसिद्धीसाठी मिडीयाकडे पाठवले होते. तसेच कोवाड पोलिस चौकोचे हे कॉं. कुशाल शिंदे व अमर सायेकर यांनीही वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र तरीही  सायंकाळी सहा नंतर या तीघांनी पाण्यातून रस्ता पार करण्याचा निर्णय घेतला आणिही दुर्दैवी घडली आहे. वाहून गेलेल्या महिलेचा शोध सुरु होता. मात्र रात्र झाल्याने शोध थांबविण्यात आला असून उदया शोधमोहीम हाती घेण्यात येणार आहे. अधिक तपास हे. कॉ. कुशाल शिंदे करत आहेत.

वाहून जाण्याची चंदगड तालुक्यातील एकाच दिवसातील दुसरी घटना
             चंदगड तालुक्यातील नागरदळे येथील एअर इंडियामध्ये काम करणारा युवक सुट्टीनिमित्त गावी आला होता. मित्रासोबत ओढा पार करताना पाण्याचा अंदाज न आल्याने नागरळे येथील अभिषेक संभाजी पाटील ( वय -२६ ) हा युवक दुचाकीसह वाहून गेला. हि घटना दुपारी चारच्या दरम्यान घडली. या घटनेची माहीती लोकांना मिळतो न मिळतो तोच तळगुळी येथील सुनिता पांडूरंग कग्राळकर  हि महिलाही सायंकाळी  ओढा ओलांडताना पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याची तालुक्यातील दुसरी घटना घडली आहे. चंदगड तालुक्यात आताही मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नागरीकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. 
                                    



No comments:

Post a Comment