विजेच्या धक्याने दुंडगे येथे गायीचा मृत्यू , सुदैवाने मुलगा बचावला - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2021

विजेच्या धक्याने दुंडगे येथे गायीचा मृत्यू , सुदैवाने मुलगा बचावला


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         दुंडगे (ता. चंदगड) येथे नदीघाटावर विद्युत वाहिनीचा धक्का बसून पुंडलिक सुबराव जाधव यांच्या गायीचा मृत्यू झाला. गायीला चारण्यासाठी नदी घाटावर घेऊन गेलेला स्वप्नील पुंडलिक जाधव सुदैवाने या अपघातातून बचावला.

     ताम्रपर्णी नदिला आलेल्या महापुरामध्ये विज वितरण कंपनिचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये दुंडगे नदिकाठावरील विजेचे खांब कोलमडून पडले आहेत.  तशाच या विद्युत तारा दुंडगे  येथील नदिकाठावरील घाटावर पडलेल्या होत्या. स्वप्निल जनावारे घेऊन घाटावर गेला असता यापैकी एका गायीचा स्पर्ष या विद्युत वाहीनीला झाला. त्यामुळे  गाय तात्काळ  मृत्यूमुखी पडल्याने ८० हजारांचे नुकसान झाले. सुदैवाने स्वप्नीलच्या लक्षात हा प्रकार आल्याने तो त्या वाहीनीपासून दुर राहीला. त्यामुळे बचावला. ग्रामस्थांनी अशा विद्युत तारा पडल्या असल्यास सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment