पुरातून वाहून गेलेल्या त्या दोघांच्या नातेवाईकांना ८ लाखांचा धनादेश - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2021

पुरातून वाहून गेलेल्या त्या दोघांच्या नातेवाईकांना ८ लाखांचा धनादेश

धनादेश स्विकारताना मृतांचे नातेवाईक

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         घुल्लेवाडी-निटूर दरम्यानच्या ओढ्यात वाहून गेलेल्या तळगुळी येथील महिला तसेच कडलगे नजीक ओढ्यावरून नागरदळे युवक वाहून गेला होता. सदरील अतिशय दुर्दैवी घटना घडल्यानंतर तातडीने चौथ्या दिवशीच महा विकास आघाडीच्या माध्यमातून आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या प्रयत्नाने नैसर्गिक आपत्ती मध्ये वाहून गेलेल्या दोन्ही मृतांच्या वारसांना शासनामार्फत आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी चार लाख रुपयांचा धनादेश आमदार साहेबांचे प्रतिनिधी म्हणून भिकू गावडे ,तानाजी गडकरी, परशराम पाटील, बाळू चौगुले, प्रवीण वाटंगी, जि. प. अरुण सुतार, दोन्ही गावातील सरपंच व सदस्यांच्या हस्ते देण्यात आला.

         यावेळी इतक्या तातडीने आर्थिक मदत फक्त जाहीरच न करता धनादेश मिळवून दिल्याबद्दल आमदार राजेश पाटील तसेच उपस्थित चंदगड चे तहसीलदार विनोद रणावरे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे व संबंधित अधिकाऱ्यांचे आभार तळगुळीचे उपसरपंच जुबेर काझी यांनी मानले.

No comments:

Post a Comment