सी. एल. न्युज इफेक्ट - कालकुंद्री स्मशानशेड मधील खराब दाहिनी ग्रामपंचायतीने बदलली - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2021

सी. एल. न्युज इफेक्ट - कालकुंद्री स्मशानशेड मधील खराब दाहिनी ग्रामपंचायतीने बदलली

                                  

लोखंड व बिडाची नवीन बसवलेली जाळी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         कालकुंद्री (ता चंदगड) येथील स्मशानभूमीतील शेडचे पत्रे आणि बीडाच्या दोन्ही दाहिनी युनिट जाळ्या निकामी झाल्या होत्या. या खराब जाळ्या तात्काळ नवीन बसवून पत्रा शेड ची दुरुस्ती करावी या मथळ्याखाली चंदगड तालुक्याचे मुखपत्र असलेल्या चंदगड लाईव्ह न्युज चॅनेल तथा सी. एल. न्यूजने बातमी प्रसिद्ध केली होती. याची तात्काळ दखल घेत कालकुंद्री ग्रामपंचायत मे जास्त खराब झालेली एक दाहीनी आज दि. २७ जुलै रोजी नवीन बसवली.  

कालकुंद्री येथील दुरवस्थेतील स्मशान शेड जाळी बसवताना ग्राम पं. सदस्य व ग्रामस्थ.

         चंदगड तालुका व परिसरात कालकुंद्रीतील वैकुंठ स्मशानभूमी सर्व सोयींनी युक्त म्हणून प्रसिद्ध आहे. तथापि ताम्रपर्णी नदी काठावरील स्मशानभूमीत  पंचवीस वर्षापूर्वी तसेच दहा वर्षांपूर्वी बांधलेल्या अशा दोन्ही शेडचे पत्रे गंजून व वादळामुळे निकामी झाले आहेत. 

           मोठ्या पावसाच्या वेळी बहुतांशी पाणी पेटत्या दाहिनी वर पडते. दोन दाहिनी युनिट पैकी एक पूर्णपणे निकामी तर दुसरी नादुरूस्त झाली होती.  दोन दिवसात अधिक मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराच्यावेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.  ग्रामपंचायतीने एक जाळी बसवली असली तरी दुसरी जाळी तसेच स्मशान शेड पत्रा दुरुस्ती कामाची पंस. सदस्य, जिप. सदस्य, आमदार आदी लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन तात्काळ पूर्तता करावी अशी मागणी होत आहे. नवीन जाळी बसवताना ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment