तरूणांनी व्यावसायिक शिक्षणाकडे संधी म्हणून पहावे - पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर, पाटणे फाटा येथे सावली इन्स्टिट्यूटचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2021

तरूणांनी व्यावसायिक शिक्षणाकडे संधी म्हणून पहावे - पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर, पाटणे फाटा येथे सावली इन्स्टिट्यूटचा शुभारंभ

पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील सावली इन्स्टिट्यूट च्या शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना पो.नि.बी ए तळेकर,बसलेले संदीप पाटील, डाॅ पाटील, निवगिरे,मोरे आदी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
     डिझाईनींग, ग्राफिक्स, डीटीपी यासारख्या व्यवसायिक शिक्षणामुळे करिअरच्या संधी ला भरपूर वाव आहे. कधीही न संपणारा हा विषय आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यातील तरुणानी आपला दृष्टिकोन बदलून असे शिक्षण घेण्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहावे,चंदगड तालुक्यात गुणवत्ता ठासून भरलेली आहे. मात्र येथील तरुणांनी योग्य दिशेने वाटचाल करायला हवी. व्यावसायिक शिक्षणाकडे संधी म्हणून पाहणे सध्या गरजेचे आहे.असे प्रतिपादन चंदगडचे पोलीस निरीक्षक बी ए तळेकर यांनी व्यक्त केले.
         पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे सावली इन्स्टिट्यूट च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.प्रारंभी प्रास्ताविक सावली इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी करून इन्स्टिट्यूटचा उद्देश स्पष्ट केला.पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर यांच्या हस्ते या इन्स्टिट्यूटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांनी जगाला गरज आहे ते देण्याचा प्रयत्न सावली इन्स्टिट्यूट ने केला आहे. 
      कोरोनाच्या महामारीत संपूर्ण जग थांबले मात्र ग्राफिक्स डिज़ाइनिंगद्वारे मात्र जग एकमेकांशी बोलत होते. या ग्राफिक्स मुळे युवकांना स्वताच्या पायावर उभे राहण्यास मदत होत असून युवकानी सावली इन्स्टिट्यूट मध्ये सूरू केलेल्या कोर्सेसचा लाभ घेऊन आपले भविष्य घडवावे असे आवाहन केले. यावेळी ग्रा.प. सदस्य निवृती हारकारे, नारायण गडकरी, विलास कागणकर, डॉ. विलास पाटील, शिवाजी मोरे, उपाध्यक्ष निवृत्ती निवगिरे यांचेसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. आभार संतोष सुतार यांनी मानले.


                   
                

No comments:

Post a Comment