चंदगड तालुक्यातील पूरग्रस्त पिकांचे व नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्याची मागणी, काॅग्रेसचे तहसीलदार यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

26 July 2021

चंदगड तालुक्यातील पूरग्रस्त पिकांचे व नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्याची मागणी, काॅग्रेसचे तहसीलदार यांना निवेदन

चंदगड तालुक्यातील पूरग्रस्त पिकांचे व घरांचे पंचनामे करण्याची मागणीचे निवेदन काॅग्रेस च्या वतीने तहसीलदार विनोद रणवरे याना देताना तालुकाध्यक्ष देसाई, नगरसेवक गुरबे,बाबासाहेब देसाई आदी. 

माणगाव / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालुक्यात पडलेल्या मूसळधार पावसाने विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करावे व शेतीचे प्रत्यक्ष पंचनामे करण्याची मागणी चंदगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तहसीलदार विनोद रणवरे यांचेकडे केली आहे. 

        तालुक्यात चार दिवसापूर्वी झालेल्या  अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात ताम्रपर्णी व घटप्रभा महापूर आला आहे.साधारण २०१९ सालापेक्षाही मोठा पुर यावेळी आलेला आहे.आठवडाभर पाण्यात गेलेली सर्व पिके कुजली न आहेत . तालुक्यातील बऱ्याच घरामधे पुराचे पाणी गेल्या मुळे बरीच कुटूंबे विस्थापित झाली आहेत त्याना नुकसान भरपाई देण्यात यावी. सततच्या येणाऱ्या पुरामुळे तालुक्यातील जनता दरवर्षी अडचणीत येत असते . त्यामुळे सर्व गोष्टींचा अभ्यास करून शासन निकष बाजूला ठेवून प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीचे प्रामाणिक पंचनामे व्हावेत त्याच बरोबर शेतीच्या नुकसान भरपाईचे पंचनामे प्रत्यक्ष वहिवाट व हस्तलिखित सातबारा पीक पाणी नोंदी नुसार होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई-शिरोलीकर, नगरसेवक अभिजीत गुरबे, राजेंद्र परीट, बाबासाहेब देसाई, उदय देसाई, प्रकाश इंगवले, प्रसाद वाडकर आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

No comments:

Post a Comment