![]() |
डीवायएसपी गणेश इंगळे हर्षद सुदर्शनचा सत्कार करताना सोबत स. पो. नि. अविनाश माने, विनायक पाटील |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
महापुराच्या या नैसर्गिक आपत्तीत महावितरण ने अहोरात्र काम केले आहे. नेसरी महावितरणचा कर्मचारी हर्षद विजय सुदर्शने याने जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून पोहत जाऊन नेसरी परीसरातील १२ गावांचा विजपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे जिगरबाज हर्षदसह नेसरी महावितरणचे कर्मचारी कौतुकास पात्र असल्याचे मनोगत गडहिंग्लज उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यानी व्यक्त केले.
नेसरी पत्रकार संघ व नेसरी पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने महापुरात धाडस दाखवून विजपुरवठा चालू केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ स्वरा मोटर्स नेसरी येथे आयोजित केला होता . यावेळी डी .वाय.एस.पी. गणेश इंगळे बोलत होते . या प्रसंगी नेसरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश माने , पत्रकार एस.के पाटील , पत्रकार संघाचे अध्यक्ष रविंद्र हिडदुगी , दिनकर पाटील, महावितरणचे श्री दंडवते उपस्थित होते .
स्वागत व प्रास्ताविक पत्रकार विनायक पाटील यानी केले. डि.वाय.एस.पी. गणेश इंगळे यांच्या हस्ते हर्षदचा सत्कार करण्यात आला. यावेळी महावितरणचे जिगरबाबाज कर्मचारी सचिन पाटील, भैरू देसाई, शाम देसाई, प्रशांत देसाई, मैनुद्दिन शेख, प्रकाश पोटे, आशय बागडी, प्रथमेश दळवी, ओमकार भोसले, युवराज घाटगे, दिग्विजय देसाई यांच्यासह पत्रकार संजय धनके व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. आभार रविंद्र हिडदुगी यानी मानले.
No comments:
Post a Comment