चंदगड विधानसभा मतदारसंघातील बंधारे दुरूस्तीसाठी ११ कोटींची मंजूरी -आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

20 July 2021

चंदगड विधानसभा मतदारसंघातील बंधारे दुरूस्तीसाठी ११ कोटींची मंजूरी -आमदार राजेश पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
 चंदगड विधानसभा मतदार संघातील बंधारे दुरूस्तीसाठी सन २०/२१ या आर्थिक वर्षात ४ कोटी निधी  व सन २१/२२ या आर्थिक वर्षासाठी ७ कोटी  असे  ११ कोटी रूपये मंजूर झाल्याची माहिती आमदार राजेश पाटील यानी दिली.
 चंदगड विधानसभा मतदार संघातातील शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, दळणवळणाची सोय व्हावी यासाठी अनेक ठिकाणी ५० वर्षापूर्वी कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत . परंतू दगडी बांधकामामुळे बंधा - यांना गळती लागून बांधकाम कमकुवत होवून अपेक्षीत पाणीसाठा होण्यासाठी बंधा - याच्या दुरुस्ती व्हावी अशी अनेक वर्षापासून मागणी होत होती . त्याचप्रमाणे चंदगड विधानसभा मतदार संघातील जवळपास २०- २१ लघुपाटबंधारे प्रकल्प बांधण्यात आले असून केवळ निधीअभावी त्या प्रकल्पाची दुरावस्या झाली आहे.तसेच घटप्रभा , फाटकवाडी , जांबरे व जंगमहटी मध्यम प्रकल्पाची जवळपास सारखीच अवस्था झाली आहे . याकरीता रु .११ कोटी मंजूर केले आहेत . सन २०२१-२२ मध्ये झांबरे मध्यम प्रकल्पा अंतर्गत दुरुस्ती व चौक्या दुरुस्ती तसेच कोल्हापूर पध्दतीचा बंधारा दुरुस्तीसाठी उमगांव , व्हावेली , कुर्तनवाडी , माणगांव , चंदगड , कोकरे याकरीता रक्कम रुपये १.५ कोटी मंजूर करणेत आले आहे . चित्री मध्यम प्रकल्प तालुका आजरा अंतर्गत सन २०२१-२२ मध्ये दुरुस्ती व चौक्या दुरुस्ती तसेच कोल्हापूर पध्दतीचा बंधारा दुरुस्तीसाठी जरळी , निलजी , गजरगांव , खणदाळ याकरीता १ कोटी मंजूर करणेत आले आहते . लघुपाटबंधारे प्रकल्पअंतर्गत सांडवा कालवा अस्तरीकरण पोहचरस्ता आणि दुरुस्ती लकीकटटे , आंबेवाडी , किटवाड , कळसगादे , शेंद्री , वैरागवाडी , येणेचंवडी , तेरणी , कुमरी , एरंडोळ , शिरसंगी , बिद्रेवाडी , कांर्जिणे , हेरे , करंजगाव , खडकहोळ , जेलूगडे , कळसगादे , पाटणेअंतर्गत शिप्पूर याकरीता ४.७५ कोटी मंजूर करणेत आले आहे . घटप्रभा , जंगमहटी , जांबरे या प्रकल्पाच्या सर्व्हेक्षणासाठी ९ ० लाख मंजूर करणेत आले असल्याची माहिती आमदार श्री पाटील यानी दिली .
 विधानसभा निवडणूकीनंतर  आमदार राजेश पाटील ,  यांनी सलग दोन वर्षाच्या कोरोना कालावधीमध्ये लॉकडाउनसारखी परिस्थिती असताना सुध्दा   जयंत पाटील , जलसंपदामंत्री व  हसन मुश्रीफसो ,ग्रामविकास मंत्री यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे सदर निधी मंजूर करुन घेणेस यश मिळाले . यामुळे चंदगड विधानसभा मतदार संघातील शेतक - यामध्ये आनंदाचे वातारण निर्माण झाले आहे . वरील सर्व कामाची अंदाज पत्रक व निवीदा प्रक्रिया प्रगतीपथावर असून दुरुस्तीची कामे तात्काळ हाती घेण्याबाबत पाटबंधारे विभागास  आमदार राजेश पाटील यांनी सुचना दिल्या आहेत.



No comments:

Post a Comment