कोरोना हॉटस्पॉट गावांतील कुंटूंब प्रमुखांची कोरोना चाचणी घेणार - तहसिलदार विनोद रणवरे, कोणत्या गावाचा आहे समावेश, वाचा सविस्तर..... - चंदगड लाईव्ह न्युज

20 July 2021

कोरोना हॉटस्पॉट गावांतील कुंटूंब प्रमुखांची कोरोना चाचणी घेणार - तहसिलदार विनोद रणवरे, कोणत्या गावाचा आहे समावेश, वाचा सविस्तर.....


संपत पाटील / चंदगड - सी. एल. वृत्तसेवा
कोरोणाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी चंदगड तालूक्यातील कोरोणा हॉट-स्पॉट गावातील प्रत्येक कुटूंब प्रमुखाची व लक्षणे असणाऱ्या सदस्यांची कोरोणा चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती चंदगडचे तहसिलदार विनोद रणावरे यानी दिली.
चंदगड येथे कोरोणा नियंत्रणासाठी आयोजित उपस्थित तहसिलदार विनोद रणावरे, बीडीओ श्री. बोडरे, सौ. सुभेदार, श्री जगताप, डॉ. खोत.

   चंदगड तालूक्यात कोरोणाच्या दुसऱ्या लाटेत चंदगड,  अडकूर, हलकर्णी, तुर्केवाडी, माणगाव व कोवाड या गावामध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यावर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी कोरोणा चाचणी महत्वाची आहे. यासाठी या गावामधील प्रत्येक कुटूंब प्रमुखाची कोरोणा टेस्ट घेण्यात येणार आहे.  माणगांव गावापासून याची सुरवात करण्यात येणार आहे. यासाठी कुटुंब संख्येनुसार पथक नेमण्यात आले आहेत. यामध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांबरोबरच तलाठी, ग्रामसेवक, माध्यमिक, प्राथमिक शिक्षक, आशा, अंगणवाडी सेवीका, पोलिस, ग्रामपंचायत व कोरोणा दक्षता समिती यांची मदत घेण्यात आली आहे. ग्रामस्थांनी या तपासणीला सहकार्य करावे. आज या संदर्भात चंदगड तहसिलदार कार्यालयात प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार श्री. राजगोळे, बोडीओ चंद्रकांत बोडरे, सीइओ श्री जगताप, गटशिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार, विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ.  आर. के. खोत, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक उपस्थित होते.


No comments:

Post a Comment