तुडये येथे गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क ची कारवाई,तीन लाख ९६हजार रू.चा मुद्देमाल जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2021

तुडये येथे गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क ची कारवाई,तीन लाख ९६हजार रू.चा मुद्देमाल जप्त



चंदगड / प्रतिनिधी

 तुडये (ता. चंदगड) येथे म्हाळुंगे रस्त्यावर बेकायदेशीररित्या गोवा बनावटीचा मद्यासाठा वाहतूक करताना  राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक टेम्पो पकडला. त्यामध्ये विविध विदेशी ब्रँडच्या ७५० मिली बाटल्यांचे ५ बॉक्स आढळून आले. याप्रकरणी विनोद कल्लाप्पा पाटील (वय वर्षे २९ व राजेश खाचाप्पा कांबळे (वय वर्षे २१ दोघेही रा. तुडिये ता. चंदगड) या दोघांना पथकाने ताब्यात घेतले आहे.त्यांच्या कडून टेम्पोसह३ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तूडये -  म्हाळुंगे रस्त्यावर तुडये येथे शुक्रवारी सकाळी तपासणी सुरू केली असता गोव्याकडून येणारा पांढऱ्या रंगाचा टेम्पो (क्रमांक केए२२ बी ३८१९ )अडविला असता त्यामध्ये ५ बॉक्स मद्यासाठा आढळून आला. सदर कारवाई निरीक्षक एम. एस. गरुड, दुय्यय निरीक्षक ए. बी. वाघमारे, जी. एन. गुरव,एस आर ठोंबरे, एन एस केरकर,आर एम कोरी,थोरात,जाधव आदनी केली.अधिक तपास निरीक्षक गरुड  करीत आहेत.




No comments:

Post a Comment