हलकर्णी येथे प्रा. मगदूम व ्प्रा. मापटे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

21 July 2021

हलकर्णी येथे प्रा. मगदूम व ्प्रा. मापटे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

हलकर्णी (ता. चंदगड येथे  प्रा. एम. बी. मापटे यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन सत्कार करताना गोपाळराव पाटील, बाजूला सौ. जयश्री मापटे, अशोक जाधव, संजय पाटील, विशाल पाटील आदी.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         सेवा निवृत्ती ही जीवनाची नवी सुरुवात असते. जीवनात ज्ञानदानाला अधिक महत्व आहे. विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय नोकरीच्या काळात देणं, हीच शिक्षकांची खरी कमाई असते. आयुष्यात सर्वार्थानं समृध्द होताना गुरु - शिष्याचे नाते खूप महत्वाचे असते. वाचन - ज्ञान - अध्ययन - अध्यापन आणि ज्ञानाचा समजासाठीचा उपयोग यातच खरा शिक्षक असतो." असे प्रतिपादन गोपाळराव पाटील यांनी केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित सेवा निवृत्ती समारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील क. महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. ए. बी. मगदूम व प्रा. एस. बी मापटे यांच्या सेवा निवृत्ती निमित्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. यु. एस. पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले. 

हलकर्णी येथे प्रा. ए. बी. मगदूम यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन सत्कार करताना अशोक जाधव, बाजुला सौ.लता मगदूम, गोपाळराव पाटील, संजय पाटील.

       यावेळी गोपाळराव पाटील यांच्या हस्ते प्रा. एम. बी. मापटे यांचा तर अशोक जाधव याच्या हस्ते प्रा. ए. बी. मगदूम यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन प्राचार्य प्रा. पी. ए. पाटील यांनी केले. यावेळी डॉ. ए. पी. गवळी, प्रा. आर. बी. गावडे, सुधीर गिरी यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालायाविषयी व संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर सचिव विशाल पाटील, उपाध्यक्ष पाटील, निंगाप्पा आवडण, शिवाजी हसबे, उत्तम पाटील यांचेसह सौ. लता अरविंद मगदूम व सौ. जयश्री महादेव मापटे व्यासपीठावर उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा. जी. जे. गावडे यांनी केले. आभार डॉ. राजेश घोरपडे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयात सर्व शिक्षक - कर्मचारी उपस्थित होते.


                                  No comments:

Post a Comment