तेऊरवाडीचे डॉ .जी.आर. पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून येणेचवंडी ग्रामस्थानी केला सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

19 July 2021

तेऊरवाडीचे डॉ .जी.आर. पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून येणेचवंडी ग्रामस्थानी केला सन्मान

डॉ. जी. आर. पाटील यांचा सत्कार करताना येणेचवंडी ग्रामस्थ.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         कोरोणाच्या कठीण काळात समाज प्रबोधनाबरोबरच सर्वसामान्य जनतेला अहोरात्र वैद्यकिय सेवा पुरवणारे तेऊरवाडीचे डॉ. जी. आर. पाटील हेच खरे कोरोणा योद्धा असल्याचे गौरवास्पद विचार येणेचवंडीचे सरपंच  भारत झळके यानी व्यक्त केले.

      येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामस्थांच्या वतीने डॉ. जी. आर. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच भारत झळके अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

  डॉ. पाटील यांनी हलकर्णी सह परिसरातील लहान मोठ्या खेडयामध्ये कोरोणाच्या खडतर काळात वैद्यकिय सेवा पुरवली. अनेक ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी, मास्क वाटप, असेंनिक अल्बन गोळ्या वाटप केल्या .कोरोणासंदर्भात समाजप्रबोधन केले. गरीब रुग्णांना अत्यल्प खर्चात सेवा देवून जीवनसंजिवनी दिली. तेऊरवाडीमध्येही एकता गृपच्या माध्यमातून गावातील सर्वांची वैद्यकिय तपासणी करुन गोळ्या वाटप केल्या होत्या. केवळ जनतेच्या आरोग्यासाठी सदैव झटत राहणाऱ्या डॉ. पाटील यांचा गौरव कोरोणा योद्धा म्हणून झाल्याने सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ. पाटील यांनी सर्वाना मोफत मास्कचे वाटप केले. या कार्यक्रमास उपसरपंच तानाजी कुराडे, संजय बिरंजे, शंकर कांबळे, शिवाजी कुराडे, भैरू बिरंजे, दत्ता कांबळे, दत्तात्रय लोंढे, संजय शिंदे, ताराबाईं कुराडे, रेणूका बिर्जे आदि मान्यवर उपस्थित होते. स्वागत अमित नंद्यानावर यानी केले. आभार अविनाश कुराडे यानी मानले.

No comments:

Post a Comment