तडशिनहाळ येथील अनाथांना हेल्पिंग हँड्स युथ सर्कलच्या वतीने जीवनावश्यक व शैक्षणिक वस्तुची भेट - चंदगड लाईव्ह न्युज

19 July 2021

तडशिनहाळ येथील अनाथांना हेल्पिंग हँड्स युथ सर्कलच्या वतीने जीवनावश्यक व शैक्षणिक वस्तुची भेट

तडशिनहाळ येथील अनाथांना हेल्पिंग हँड्स युथ सर्कलच्या वतीने जीवनावश्यक व शैक्षणिक वस्तुची भेट दिली. त्याप्रसंगी हेल्पिंग हँड्स युथ सर्कलचे पदाधिकारी.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      हेल्पिंग हँड्स युथ सर्कल महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेकडून तडशिनहाळ (ता. चंदगड) येथील कु. यश युवराज कांबळे व कु. श्रेयश युवराज कांबळे या दोन्ही अनाथ विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, इन्वर्टर बल्ब, शैक्षणिक साहित्य,कपडे. तसेच दोघांची दहावीपर्यंतच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली. 

भेट दिलेले साहित्य.

        सरपंच व पोलीस पाटील यांच्या सोबत चर्चा करून घरकुल संदर्भात आणि अनाथांसाठी असणाऱ्या योजना संदर्भात विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी विनंती केली. सेंट अँथोनी इंग्लिश मीडियम स्कूल आनंदवाडी येथील मुख्याध्यापीकांना भेटून  शालेय फी मध्ये सवलत देण्यासाठी अर्ज दिला आहे. या प्रसंगी संस्थापक सौरभ पाटील, संस्थेचे संचालक व सदस्य मंगेश सूर्यवंशी, प्रदीप कुंभार, मल्लाप्पा पाटील, संकेत अर्दाळकर, परशुराम जोशी, सतीश पाटील, संतोष सासुलकर, जोतिबा पाटील, राजेश पाटील उपस्थित होते. No comments:

Post a Comment