देवरवाडी येथील रक्तदान शिबीराला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद, कोरोना काळात रक्तदान उत्तम दान - चंदगड लाईव्ह न्युज

19 July 2021

देवरवाडी येथील रक्तदान शिबीराला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद, कोरोना काळात रक्तदान उत्तम दान

देवरवाडी (ता. चंदगड) येथील रक्तदान शिबिरावेळी लोकमत चे उपसरव्यवस्थापक संजय पाटील, सरपंच गीतांजली सुतार, उपसरपंच गोविंद आडाव, सामाजिक कार्यकर्ते संघर्ष प्रज्ञावंत, शंकर भोगण, नंदकुमार ढेरे आदी 

माणगाव / प्रतिनिधी

         लोकमत'चे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित' लोकमत रक्ताचं नातं' या उपक्रमांतर्गत देवरवाडी (ता. चंदगड) येथे आयोजित केलेल्या शिबिरात २६ जणांनी रक्तदान केले.  

      शिबिराचे उद्घाटन सरपंंच गीतांजली सुतार यांच्या हस्ते तर  लोकमत'चे संस्थापक  स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच गोविंद आडाव यांच्या हस्ते करण्यात आले. लोकमतचे उपसरव्यवस्थापक संजय पाटील व प्रतिनिधी नंदकुमार ढेरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

        कोरोना काळात लोकमत'ने आयोजित केलेले अभियान हे जनमानसात रक्ताचे नाते निर्माण करणार असल्याचे सरपंच गीतांजली सुतार यांनी सांगीतले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संघर्ष प्रज्ञावंत, सेवासंस्थाध्थक्षा शंंकर भोगण उपस्थित होते. या रक्तदात्याने रक्त दान केले. संतोष गणपत करडे, धनाजी परशराम पाटील, वैजू मारुती करडे, संजय नागो आढाव, सागर पाटील, गोविंद आढाव, जोतिबा आढाव, संभाजी केसरकर, संघर्ष मष्णू प्रज्ञावंत, सुरज बाळू केसरकर, कृष्णदेव हिंदुराव हावळ, संदीप उत्तम टिक्का, रामदास  कांबळे, कृष्णा बाबू कांबळे, संभाजी शिवाजी मनवाडकर, जिद्देश जोतिबा गवसेकर, प्रदीप महादेव कांबळे, नंदकुमार ढेरे, शंकर भोगण, नागेंद्र जाधव, रोहन भोगण, वसंत तुर्केवाडकर, बाळू भोगण, अवधूत पोळ, अनिल पाटील यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्या प्रतिभा मजुकर, मनिषा भोगण, मंजुळा कांबळे, संतोष करडे, वैजनाथ करडे, सागर पाटील, संभाजी केसरकर, जोतिबा आढाव, मधुकर जाधव, धनाजी मोहिते, धनाजी पाटील यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment