कोवाड केंद्रांतर्गत 'कार्यक्षमता प्रतवारी दर्शक' शिक्षण परिषद - चंदगड लाईव्ह न्युज

10 July 2021

कोवाड केंद्रांतर्गत 'कार्यक्षमता प्रतवारी दर्शक' शिक्षण परिषद

 

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा 

      कोवाड (ता. चंदगड) केंद्रांतर्गत सर्व जिल्हा परिषद प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांची ऑनलाइन शिक्षण परिषद दि. ९ जुलै रोजी संपन्न झाली.      

       शाळांची कार्यक्षमता प्रतवारी दर्शक (performance grade index) बाबत  शिक्षण परिषदेत मार्गदर्शन करण्यात आले. विद्या मंदिर मलतवाडी चे मुख्याध्यापक तथा प्रभारी केंद्रप्रमुख सुधीर मुतकेकर यांनी प्रशासकीय प्रक्रिया विषयावर मार्गदर्शन केले. याशिवाय सुजाता बाळकृष्ण मुतकेकर (अध्यापिका गणेश विमं. निट्टूर) यांनी 'अध्ययन निष्पत्ती' विषयावर, सागर खाडे (अध्यापक विद्यामंदिर दुंडगे) यांनी 'वर्ग व्यवहार आंतरक्रिया' विषयावर. संतोष सुर्यवंशी (अध्यापक तेऊरवाडी) यांनी 'पायाभूत सुविधा, विद्यार्थी हक्क, शाळा सुरक्षितता आणि बाल संरक्षण' विषयावर तर आप्पाराव पाटील (मुख्याध्यापक विमं. किणी) यांनी डिजिटल अध्ययन या विषयावर मार्गदर्शन केले. सुधीर मुतकेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण परिषदेचे स्वागत अनंत पाटील यांनी केले. संयोजन व प्रस्ताविक केंद्र समन्वयक विलास पाटील यांनी केले. केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वै. पाटील यांनी आभार मानले. परिषदेस कोवाड केंद्रातील १० प्राथमिक व ८ माध्यमिक शाळांतील सर्व अध्यापक उपस्थित होते.



No comments:

Post a Comment