योग स्पर्धेत डॉ. संदेश गायकवाड देशात प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

10 July 2021

योग स्पर्धेत डॉ. संदेश गायकवाड देशात प्रथम

योगाचे प्रात्यक्षिक दाखविताना डॉ. संदेश गायकवाड

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          आग्रा, उत्तर प्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय योग स्पर्धेत चंदगड तालुक्यातील हलकर्णी गावचे सुपुत्र डॉक्टर संदेश लक्ष्मण गायकवाड हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. विविध क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या चंदगड तालुक्याच्या शिरपेचात संदेश च्या यशामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 
         डॉ. संदेश यांनी सादर करण्यास अत्यंत अवघड अशी मेरू दंडासन, पद्म शिर्शासन, पद्म मेरुदंडासन, धनुरासन, कुक्कुटासन, शीर्षासन युक्त पाद नमस्कार आदी योगासने व विविध योग मुद्रा लिलया सादर करून सर्वांची मने जिंकत प्रथम क्रमांकही पटकावला. या स्पर्धेत राजस्थानच्या गरिमा कौशिक आणि मध्यप्रदेशच्या शिखा सिंह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसर्‍या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
        एस. आर. एस. आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल आग्रा यांच्या वतीने या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. योग शिक्षण ही भारताने जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे. अशा महत्त्वाच्या व मोठ्या स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावत  संदेश  यांनी चंदगड तालुक्यासह कोल्हापूर जिल्हा व महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. डॉ.संदेश यांचे हे यश चंगळवादात गुंतलेल्या युवक-युवतींसाठी एक आगळावेगळा 'संदेश' च आहे.No comments:

Post a Comment