अडकूर येथे खड्यामुळे वाहतुकीला अडथळा - चंदगड लाईव्ह न्युज

10 July 2021

अडकूर येथे खड्यामुळे वाहतुकीला अडथळा

अडकूर (ता. चंदगड) येते वाहतुकीला अडथळा ठरलेला खड्डा. 


अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

         अडकूर (ता. चंदगड) येथे शेतकरी संघ व तालुका संघ तसेच कृषीसेवा केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यात गेल्या पंधरा-वीस दिवसापासून खड्डा खणून तो न मुजवता तसाच ठेवला आहे. 

          या खड्यावरुन जाताना पंचक्रोशीतील नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. शेतीसाठी उपयुक्त सामानाची वाहतुक करताना या रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे यावरुन वाहतुक करणाऱ्या नागरीकांची गैरसोय होत आहे. याकडे अडकुर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्याचे दिसते. हा खड्डा लवकरात-लवकर भरुन रस्ता वाहतुकीला सुरळीत करावी अशी मागणी शिवराज देसाई यांच्यासह अडकूर परिसरातील नागरीकांची आहे.  
No comments:

Post a Comment